मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
ज्या बापाने रक्ताचं पाणी करून मुलांना वाढवलं, त्यांना शेतजमीन कमावून दिली, त्याच बापाला जमिनीचा उपभोग घेतल्यानंतर म्हातारपणात वाऱ्यावर सोडणाऱ्या दोन कलयुगी मुलांचा संतापजनक कारनामा समोर आला आहे.
वय वर्ष ८० असलेल्या हतबल वडिलांना गावात भीक मागून खाण्याची वेळ आणणाऱ्या या दोन कृतघ्न मुलांविरोधात मंद्रुप पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करत खाकीचा दणका दाखवला आहे.

याप्रकरणी पांडुरंग बाबुराव गुंड (वय ८०, रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर) या हतबल वृद्ध पित्याने दि.२० मे २०२६ रोजी मंद्रुप पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपल्याच पोटच्या मुलांविरोधात फिर्याद दिली आहे.

काय आहे धक्कादायक प्रकरण?
पांडुरंग गुंड हे वडापूर येथील रहिवासी असून त्यांना दोन मुले आहेत. मुलांनी वडिलांची शेतजमीन स्वतःच्या नावावर करून तिचा पुरेपूर उपभोग घेतला. मात्र, जमीन हातात येताच मुलांनी बापाचे उपकार विसरून त्यांचा छळ सुरू केला. सन २०२४ पासून आजतागायत दोन्ही मुलांनी मिळून या वृद्ध वडिलांची भयानक उपासमार केली.

भीक मागण्याची आली वेळ
क्रूरतेची हद्द म्हणजे, ८० वर्षांचे पांडुरंग गुंड हे गंभीर आजारी असतानाही नराधम मुलांनी त्यांच्यावर उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला. सध्या हे वृद्ध वडील गावात निराधार अवस्थेत फिरत असून, जगण्यासाठी लोकांना हात पसरून, भीक मागून पोट भरत आहेत. मुलांनी त्यांना केवळ अन्न-पाण्यावाचून वंचित ठेवले नाही, तर प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासही दिला आहे.

पोलिसांचा थेट दणका
“माता-पिता व ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन आणि कल्याण कायद्यान्वये” वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे हे मुलांचे कायदेशीर कर्तव्य आहे. या कायद्याचे आणि मानवी हक्कांचे उघड उल्लंघन केल्याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी दोन्ही मुलांवर थेट गुन्हा दाखल केला आहे.

या संतापजनक घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण हे करत आहेत. बापाची जमीन लाटून त्यांना रस्त्यावर आणणाऱ्या या कलयुगी मुलांना कायदा आता काय धडा शिकवणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











