मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सद्गुरुंच्या बैठकीस गेलेल्या पत्नीला आणावयास दुचाकीवरून निघालेल्या पतीचा कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
मंगळवेढा-आंधळगाव महामार्गावर मंगळवारी (दि.१९) सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नारायण साधू चव्हाण (वय ६२, रा. शेलेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

संतोष नारायण चव्हाण यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार त्यांचे वडील नारायण चव्हाण हे काल मंगळवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास आंधळगाव-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून (क्र. एमएच १३ एआर ४३०९) जात होते.

नडगिरे हॉस्पिटलजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (क्र. एमएच १९ ईजी ८३२०) धडक दिली.

यात गंभीर जखमी होऊन चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातनंतर कारचालक फरार झाला. अधिक तपास हवालदार धनंजय आवताडे करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












