mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर ३ दिवस सोबतच गुवाहाटीमध्ये; हॉटेलच्या डिटेल्स समोर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 14, 2026
in राज्य
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

अशोक खरात याचे उद्योग समोर आल्यानंतर आपला काहीही संबंध नाही, असे दाखविणाऱ्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर चांगल्याच अडकल्या आहेत.

महाराष्ट्रातील सत्तांतरावेळी जे गुवाहाटी चर्चेत आले, त्याच गुवाहाटीला अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांनी दौरा केला. विशेष म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्या दौऱ्यात सहभागी होत्या.

गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रॅडिसन येथे तिघांनीही तीन दिवस मुक्काम केला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे खरात प्रकरणातच आर्थिक अफरातफरीचा आरोप ठेवून चाकणकर यांना ईडीने आज चौकशीसाठी बोलावले आहे. त्याआधी त्यांचा खरातसोबत गुवाहाटी दौरा समोर आल्याने चाकणकर चहूबाजूंनी अडकल्याचे बोलले जाते.

अशोक खरात याच्या नाशिकच्या मिरगावातील काळ्या कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. श्रीमंत भक्तांना भुलवून त्यांच्याकडून लाखो रूपये उकळून, शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा कारनामे त्याने केले. त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.

याच प्रकरणात खरात सोबत असलेल्या जवळीकतेमुळे चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. खरातसोबत आपले थेट संबंध नव्हते, त्यांना केवळ आध्यामिक गुरू मानत होते, असे सांगून रुपाली चाकणकर यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.

परंतु खरात याची दीड महिना चौकशी करून एसआयटीने चाकणकर यांनाही चौकशीसाठी पाचारण केल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. आता खरातसोबतच्या गुवाहाटी दौऱ्याने त्यांचा पाय अधिक खोलात गेला आहे.

चाकणकर भगिनी-अशोक खरात यांचा गुवाहाटी दौरा कधी?

भोंदू अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांनी २०२१ मध्ये गुवाहाटी दौरा केला होता. भोंदू खरात याच्यासोबत आपला काहीच संबंध नाही म्हणणाऱ्या रूपाली चाकणकर आणि त्यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांनी सोबत दौरा केल्याने आणि गुवाहाटीमध्ये मुक्काम केल्याने त्यांच्यातील जवळीकता यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

विशेष म्हणजे गुवाहाटीच्या रेडीसन ब्लू हॉटेलमध्ये एकाच तारखांना तिघेही वास्तव्यास होते. २८ ॲागस्ट २०२१ ते ३० ॲागस्ट २०२१ या तारखांना हे तिघेही रेडीसन ब्लू या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

या तारखांमध्ये त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्जा केल्याची शक्यता आहे. अशोक खरात भक्तांकडून लाखो रुपये घेऊन ज्या पूजा अर्चा करायचा, तशीच पूजा अर्चा गुवाहाटीमध्ये केल्याची चर्चा आहे.

पूजा अर्चेसाठी गुवाहाटी प्रसिद्ध

गुवाहाटीतील मंदिर नऊ ग्रहांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर शिवाचे मंदिर आहे. येथे विशेष पूजा अर्चा केल्या जातात. खरात याने अंगठीतील कथित ग्रहांचे खडे देऊन भक्तांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचा आरोप आहे.

चाकणकरांची आज ईडीकडून चौकशी

खरात प्रकरणात आरोप झाल्यानंतर चाकणकर यांच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली. पोलीस तपासांत गरज पडली तर त्यांची चौकशी करू, अशी भूमिका सरकारने स्पष्ट केली.

खरात याची दीड महिना चौकशी झाल्यानंतर चाकणकरांना एसआयटीने चौकशीसाठी पाचारण केले. असे असताना त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून आज त्यांची ईडीकडून चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे.

दुसरीकडे रुपाली चाकणकर यांची गुवाहाटी दौऱ्याच्या वृत्तावर अद्याप पर्यंत प्रतिक्रिया येऊ शकलेली नाही.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अशोक खरात

संबंधित बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 19, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
Next Post
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता 'लालपरी'ने करणार प्रवास

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 19, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा