टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील जुनोनी गावात फोफावलेल्या अवैध दारू व्यवसायाने आता ग्रामस्थांच्या संयमाचा अंत पाहिला आहे. या अनिष्ट प्रकाराविरुद्ध जुनोनी ग्रामपंचायतीने रणशिंग फुंकले असून, प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात प्रशासनाला जाहीर इशारा व लेखी निवेदन देण्यात आले आहे.
शाळकरी मुलांचे भवितव्य टांगणीला
विशेष म्हणजे, हा अवैध दारूचा व्यवसाय चक्क जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि हायस्कूलच्या परिसरात सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होत असून शिक्षणाचे वातावरण दूषित होत आहे. सायंकाळच्या वेळी मद्यपींच्या वाढत्या गर्दीमुळे महिला आणि मुलींना रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रशासनाला लेखी इशारा
सरपंच दत्तात्रय माने यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मंगळवेढा पोलीस ठाणे यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, “अवैध दारूमुळे अनेक सुखी संसार उद्ध्वस्त होत आहेत. गावात भांडण-तंट्याचे प्रमाण वाढले असून गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे.”

आंदोलनाचा इशारा
जर प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन संबंधित ठिकाणांवर छापे टाकले नाहीत आणि दारू कायमस्वरूपी बंद केली नाही, तर संपूर्ण गाव एकवटून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. गावाला ‘दारूमुक्त’ करण्यासाठी सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत असून आता चेंडू प्रशासनाच्या कोर्टात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज









