mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खबरदार! मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही; प्रशासकीय अधिकाऱ्यांना भरला सज्जड दम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 4, 2026
in मंगळवेढा
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्किंग ।

कामात व कर्तव्यात कोणत्याही प्रकारे कसर करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने आपापल्या कर्तव्य सेवेशी प्रामाणिक राहून

सातत्यपूर्ण कामातून जनतेच्या व तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला योगदान दिले पाहिजे असे मत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे.

आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवेढा पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी वर्गाची आढावा बैठक जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे संपन्न झाली, त्याप्रसंगी ते प्रत्येक शासकीय विभागांच्या विविध बाबींचा आढावा घेत असताना बोलत होते.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, रोजगार हमी योजनेसह विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

तसेच, नागरिकांशी संबंधित योजना वेळेत व प्रभावीपणे राबवणे, प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याबाबत स्पष्ट सूचना आमदार आवताडे यांनी दिल्या.

ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हाच या बैठकीचा मुख्य उद्देश होता. समन्वय, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या भावनेतून काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, तालुक्यात राबवण्यात येणारी जलजीवन मिशन योजना, भोसे प्रादेशिक योजना, आंधळगाव प्रादेशिक योजना आणि घरकुल आणि विहीर योजनांचे लाभार्थी तसेच आरोग्य व शिक्षण या विषयांचा सविस्तर आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

मंगळवेढा तालुक्यात प्रशासकीय पातळीवरती सुरू असलेल्या कामांना गती देण्याचा आणि ती कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचा प्रशासकीय यंत्रणेचा मानस असला पाहिजे त्यासाठी सर्वांनी लोकाभिमुख कर्तव्य सेवेला प्राधान्य द्या अशा सूचना आमदार आवताडे यांनी यावेळी दिल्या आहेत.

बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी श्रीमती जस्मिन शेख नूतन नगरसेवक प्रा.येताळा भगत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी,

काशिनाथ पाटील, सरोज काझी, सुधाकर मासाळ, माजी उपसभापती रमेश भांजे, शिवाजीराव पटाप, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील, माजी उपसभापती धनंजय पाटील, संचालक गौडाप्पा बिराजदार,

महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे कार्याध्यक्ष ॲड.शिवानंद पाटील, माजी सरपंच काका मिसकर आदी व सर्व विभागांचे अधिकारी तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक, ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
Next Post
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

डोळ्याला चटणी लावली अन् सपासप वार! मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट; सोलापुरात नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा