mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 10, 2024
in मनोरंजन, राष्ट्रीय
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेज सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला असून सामन्यात रोमांचक विजय मिळवला आहे.

न्यूयॉर्कच्या नासाउ काउंटी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. यापूर्वी सामन्याच्या अर्धातासापूर्वी दोन्ही कर्णधारांमध्ये टॉस खेळवला गेला.

हा टॉस पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने जिंकला आणि त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारताला प्रथम फलंदाजीसाठी आव्हान दिले. टीम इंडियाने पाकिस्तानी गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 119 धावा केल्या.

पाकिस्तानच्या गोलंदाजीपुढं भारताचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. रिषभ पंत आणि अक्षर पटेल या दोघांशिवाय भारताच्या इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.

भारतानं पाकिस्तान समोर 120 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्यानं चांगली गोलंदाजी केली. भारतानं पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत करत रोमहर्षक विजय मिळवला.

पाकिस्तानकडून बाबर आझमनं 13 धावा केल्या. बाबर आझमला जसप्रीत बुमराहनं बाद केलं. अक्षर पटेलनं भारताला दुसरं यश मिळवून दिलं. उस्मान खान 13 धावा करुन बाद झाला. हार्दिक पांड्यानं भारताला तिसरं यश मिळवून दिलं.

फकर झमान 13 धावा करुन बाद झाला. यानंतर जसप्रीत बुमराहनं भारताला चौथं आणि महत्त्वाचं यश मिळवून दिलं. मोहम्मद रिझवानला जसप्रीत बुमराहनं 31 धावांवर बाद केलं. हार्दिक पांड्यानं शादाब खानला 4 धावांवर बाद केलं. जसप्रीत बुमरहानं इफ्तिखारला बाद केलं.

भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला घाम फोडला

भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. जसप्रीत बुमराह पाकिस्तानचा तीन विकेट घेतल्या. आणि हार्दिक पांड्यानं पाकिस्तानच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. अक्षर पटेलनं देखील महत्त्वाची विकेट घेतली. अर्शदीप सिंगनं इमाद वसीमला बाद केलं.

भारताच्या 119 धावा

भारताच्या डावाची सुरुवात विराट कोहली आणि रोहित शर्मानं केली होती. आज भारताचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल ठरले. विराट कोहली 4 धावा करुन बाद झाला. यानंतर भारताला दुसरा धक्का रोहित शर्माच्या रुपात बसला.

रोहित शर्मा 13 धावा करुन बाद झाला. रिषभ पंत आणि अक्षर पटेलच्या भागिदारीनं भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. अक्षर पटेलनं 20 केल्या. रिषभ पंतनं केलेल्या 42 धावांच्या जोरावर भारतानं 20 ओव्हरमध्ये 119 धावा केल्या. भारतानं अखेरच्या 30 रनमध्ये 7 विकेट गमावल्या.

भारताच्या फलंदाजीमध्ये रोहित शर्मा, रिषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. भारतानं 20 ओव्हरमध्ये 119 धावांपर्यंत मजल मारली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भारत पाकिस्तान

संबंधित बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
Next Post
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

आनंदाची बातमी! उजनी 'इतक्या' टक्के भरणार; दुष्काळी भागात पाऊसमान हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचे भाकीत

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! बेपत्ता तरुणाचा जंगलात सापडला मृतदेह; रागाच्या भरात उचलले टोकाचे पाऊल; मंगळवेढ्यातील तरुणाची हृदयद्रावक आत्महत्या

May 7, 2026
मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

मंगळवेढ्यात थरकाप! पहाटेच्या अंधारात ATM वर दरोडा; पोलिसांना पाहताच दरोडेखोरांचा ‘धूम’ स्टाईलने पोबारा

May 7, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला थेट इशारा; ‘त्या’ विजयावरही संशय व्यक्त करत थेट निशाणा

May 6, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याला न्यायालयाने चारली धूळ! ५ वर्षे सक्तमजुरी आणि जबर दंड; ​पंढरपूर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; लाच मागाल तर थेट तुरुंगात जाल

May 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा