mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांनो! गावात पावसाचा मुक्काम कधीपर्यंत? हवाानतज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 1, 2023
in राज्य
बळीराजासाठी मोठा दिलासा! आजपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात; उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

राज्यभरातील अवकाळी पावसाचे ढग आता विरले असले तरी किंचित प्रभाव म्हणून २ डिसेंबरपर्यंत राज्यभरात ठिकठिकाणी तुरळक पावसाची हजेरी लागू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

विदर्भातील ११ व खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यांसह एकूण १४ जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दोन दिवस आहे.

मुंबईसह कोकण, मराठवाड्यासह उर्वरित राज्यांतील २२ जिल्ह्यांत २ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात गारपिटीची शक्यता कुठेच नाही, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

मराठवाड्यात गेल्या तीन दिवसांत ६१ मिमी. पावसाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या पावसाने मराठवाड्यातील ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे.

नांदेड जिल्ह्यातही २४ तासांत सरासरी २०.९० मिमी. पावसाची नोंद झाली असून ३ मंडळात अतिवृष्टी झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. मात्र, वाऱ्याचा वेग जास्त असल्याने तोडणीला आलेला ऊस तसेच ज्वारी पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हरभरा, तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.

द्राक्षाच्या फळबागेसह, भाजीपाल्याचेही नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे ५३ हजार ९७९ हेक्टरवरीलर पिकांचे नुकसान झाले. हिंगोली जिल्ह्यात मात्र, बुधवारी पावसाने उघडीप दिली.

सोलापुरात नाल्यात वाहून गेल्यानं तरुणाचा मृत्यू

मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात दुचाकीवरून घरी परतणारा दुचाकीस्वार कुंभार वेस येथील नाल्यात दुचाकीसह वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. दोन्ही मित्रांनी त्याला नाल्यातून बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. सलाम साबीर दलाल (वय ३५, मंगळवार बाजार, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आणखीन तीव्र झाली आहे. यामुळे 2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

या चक्रीवादळामुळेच अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तसेच महाराष्ट्रातील काही भागात गारपीट होईल. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी योग्य खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

दरम्यान, पुढील काही तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ आणि जळगाव या भागात देखील मेघगर्जना होऊ शकते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अवकाळी पाऊस

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

शेतकऱ्यांनो! आधी ‘ही’ रक्कम बँकेत भरावी लागणार; मगच मिळणार कर्जमाफी व नवीन पीककर्ज

June 5, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
Next Post
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; जरांगे-पाटलांच्या आदेशाचं पालन करत मंगळवेढ्यात साखळी उपोषणास सुरुवात

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक; जरांगे-पाटलांच्या आदेशाचं पालन करत मंगळवेढ्यात साखळी उपोषणास सुरुवात

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

शेतकऱ्यांनो! आधी ‘ही’ रक्कम बँकेत भरावी लागणार; मगच मिळणार कर्जमाफी व नवीन पीककर्ज

June 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

समृद्ध पंचायतराज अभियानात मंगळवेढ्यातील ‘या’ गावची छाप; जिल्हास्तरीय मूल्यमापन समितीकडून विकासकामांची पाहणी

June 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा