टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये कायम सक्रिय राहिलेल्या भोसे गावातील पाटील कुटुंबावर कोरोना ने सर्वात मोठा घाला घातलाय. पंढरपूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय यशवंतराव पाटील यांचे दोन चिरंजीव आणि एका सख्खा भावाचा कोरोनामुळे धक्कादायकरित्या मृत्यू झालाय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य राजूबापू पाटील यांचे निधन झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजूबापू पाटील यांचे निधन । सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य । काही दिवसापासून त्यांच्यावर कोरोना आजारवर उपचार सुरु होते.। पाटील यांच्या घरातील काही सदस्यांना कोरोनाची लागण । पत्नीवरही कोरोनावर उपचार सुरु pic.twitter.com/smTj0vVPfU
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) August 13, 2020
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष , खासदार शरद पवार यांचे एकनिष्ठ श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजूबापू पाटील यांचं कोरोनामुळे सोलापुरात निधन झालंय. गुरुवारी मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय.
तालुक्याच्या राजकारणात आपला दबदबा ठेवणार भोसे गावचे पाटील कुटुंबीय दहा दिवसांपूर्वी कोरोना बाधित आढळून आलं. पहिल्यांदा राजुबापू पाटील यांच्या चुलत्यांचे निधन झालं. त्यानंतर चारच दिवसांमध्ये राजू बापू पाटील यांचे धाकटे बंधू महेश पाटील यांचा कोरोनामुळे बळी गेला.
महेश हे घरीच उपचार घेत होते मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याला हलविण्यात येत असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वात धक्कादायक म्हणजे तालुक्याचे नेते राजू बापू पाटील यांचे देखील कोरोनाने आज मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान निधन झाले.
दहा दिवसाच्या अंतरात एकाच कुटुंबातील तीन कर्ते पुरुष कोरोनाचे बळी गेलेत. पाटील कुटुंबावर ओढवलेल्या दुःखद घटनेने तालुक्यात देखील शोककळा पसरली. राजू बापू पाटील यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर तालुक्यांमध्ये आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पंढरपूरच्या राजकारणामधील एक जाणकार नेता गेल्याची भावना आता व्यक्त होते.
Corona, the NCP’s rajubapu patil leader in Solapur district, dies, killing three members of the same family
ब्रेकिंग बातम्यासाठी : https://mangalwedhatimes.in
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज