mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा गट-गण! इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले; भोसे गटातून अनिल सावंत निवडणूक लढवणार; कोण कुठे उभारेल वाचा सविस्तर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 29, 2022
in मंगळवेढा
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीचे १० गण यांचे आरक्षण जाहीर झाले असून या आरक्षणामुळे “कभी खुशी कभी गम” अशी अवस्था झाली असून काही ठिकाणी इच्छुकांच्या मनसुभ्यावर पाणी फिरले आहे.

गेली काही दिवस जिल्हा परिषद व पंचायत समितीला कोणते आरक्षण पडणार या बाबत तर्क वितर्क मांडले जात होते. तर भोसे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे अनिल सावंत यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे.

परंतु, काल १० गणाचे ५ गटाचे आरक्षण जाहीर झाले आहे, नवीन रचनेनुसार झालेला दामाजी नगर हा गट पूर्वी सर्वसाधारण होता तो आता एस.सी महिला झाला असून येथील विद्यमान सदस्य नितीन नकाते यांच्यावर गंडांतर आले असून त्यांना आता शांत राहावे लागणार आहे.

येथील दामाजीनगर व बोराळे हे सर्वसाधारण झाले असून जिल्हा परिषदेसाठी तयारी करणाऱ्यांना पंचायत समितीसाठी तयारी करावी लागणार आहे.

विद्यमान सदस्या कल्पना गडदे यांना पुन्हा संधी मिळू शकते संत चोखामेळा नगर जिल्हा परिषद गट हा एस.सी महिलेसाठी राखीव झाला असून या गटातील विद्यमान सदस्य मंजुषा कोळेकर यांना या आरक्षणाचा फटका बसला आहे.

पुनररचनेत हा गट नवीन झाला असून लक्ष्मी दहिवडी, मरवडे, भोसे गटातील काही गावे समाविष्ट झाली आहेत.

या गटातील चोखामेळा नगर गणासाठी ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाला असून निंबोणी गण सर्वसाधारण स्त्री साठी राखीव आहे. हे दोन्ही गण नवीन झाले असल्यामुळे या गटात व गणात निवडणूक रंगणार आहे.

हुलजांती हा गट ओबीसी पुरुष या प्रवर्गासाठी राखीव झाला असून येथील विद्यमान सदस्य व माजी समाज कल्याण सभापती शीला शिवशरण यांना दुसरा मतदारसंघ बघावा लागणार आहे.

या गटातून सध्या विद्यमान सभापती प्रेरणा मासाळ यांचे पती सुधाकर मासाळ व राष्ट्रवादीचे नेते लतीफ तांबोळी, माजी सभापती प्रदीप खांडेकर हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

हुलजांती गण हा अनुसूचित जाती स्त्री साठी राखीव झाला असून विद्यमान सभापती प्रेरणा मासाल यांना जिल्हा परिषदेला उभा रहावे लागू शकते.

मरवडे गण हा अनुसूचित साठी जातीसाठी राखीव झाला असून माजी सभापती प्रदीप खांडेकर येथून निवडून आले होते. मात्र हा गण पुररचनेत विभागला गेला असून खांडेकर यांचे गाव निंबोणी गणात गेले आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण नेतृत्व करीत असलेला भोसे गट पुन्हा सर्वसाधारण झाला असून आ.आवताडे गटाकडून येथून त्यांना पुन्हा उभारण्याची संधी मिळणार आहे.

सर्वसाधारण गट झाल्याने इच्छुकांची संख्या या गटात वाढणार आहे या गटातून दिलीप चव्हाण, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत, भोसे येथील दामाजी संचालक तानाजी काकडे, सलगर येथील रामचंद्र जाधव हे देखील संघी अजमावून पाहू शकतात.

या गटातील भोसे गण हा खुला झाला असून जिल्हा परिषदेला ज्यांना संधी मिळणार नाही ते भोसे पंचायत समिती साठी नशीब अजमावणार आहेत.

सध्या तालुक्यातील भोसे जिल्हा परिषद व भोसे गण हे सुरक्षित म्हणून ओळखले जातात.

रड्डे गण हा सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षित झाल्याने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. येथील विद्यमान सदस्य नितीन पाटील यांना पुन्हा संधी असून त्यांच्यासह अनेक जण तयारीला लागले आहेत.

नव्याने निर्माण झालेला नंदेश्वर गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला असून येथील इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे.

या गटातून माजी जी.प सदस्य लता शिवाजी नागणे, विद्यमान सदस्य मंजुषा कोळेकर, मंजुषा गावकरे , तसेच रामेश्वर मासाल यांच्या पत्नी आदी जण इच्छुक आहेत.

नंदेश्वर हा गण नवीन निर्माण झाला असून हा ओबीसी आरक्षित झाला असून या जागेवर रामेश्वर मासाल, दादा गरडे, नामदेव जानकर, गेना दोलतडे, चंद्रकांत गरंडे, विष्णू मासाल आदी इच्छुक आहेत.

तसेच लक्ष्मी दहिवडी गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून येथे देखील इच्छुकांची संख्या मोठी राहणार आहे.

या गणातून निवडून गेलेल्या व उपसभापती असलेल्या लक्ष्मी दहिवडी येथील श्रीमती पाटील यांना देखील पुन्हा संधी मिळू शकते.

नुकत्याच झालेल्या दामाजी कारखाना निवडणुकीत परिचारक व भालके गटाच्या समर्थकांनी एकत्रित येत समविचारी आघाडी करून आमदार समाधान आवताडे यांची कारखान्यावरील सत्ता उलटवून लावली.

त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत समविचारी आघाडी कायम राहून आमदार आवताडे गटाला टक्कर देण्याची शक्यता व्यक्त होत असून सहकारातील ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे व खरेदी विक्री संघाचे सिद्धेश्वर आवताडे यांची भूमिका काय राहणार याकडेही नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.

आगामी निवडणुका या दुरंगी होतात की तिरंगी हे पाहणे देखील महत्त्वाचे असून काल जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये जिल्हा परिषदेत जाण्यासाठी व पंचायत समितीत जाण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल सावंत

संबंधित बातम्या

वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

मंगळवेढेकरांसाठी गोड बातमी! ‘चौंडेश्वरी रबडी हाऊस’चा आज भव्य शुभारंभ; प्रीमियम स्पेशल रबडी, थंडावा, हेल्दी ड्रिंक्स अनेक पदार्थ उपलब्ध

May 2, 2026
शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

May 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

May 2, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

पाणी येण्यापूर्वीच ‘शॉक’! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मंगळवेढ्याचा शेतकरी अंधारात; पिके करपणार? भीमा पट्ट्यातील शेतकऱ्यांवर ‘आस्मानी’नंतर आता ‘सुलतानी’ संकट

April 30, 2026
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

पंढरपुरात रंगणार भक्तीचा सोहळा! धनश्री परिवारातर्फे ५ दिवसीय ‘धनश्री प्रवचनमाले’चे आयोजन

April 30, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात मंगळवेढ्यात पाणी कपात; सलग ‘इतके’ दिवस पाणी येणार नाही

April 29, 2026
Next Post
मोठी बातमी! मंगळवेढ्यात प्रियकराच्या मदतीने केला शिक्षक पतीचा खून, पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव; असा झाला उलगडा

मुलावर तलवारीने झालेला वार आईनं झेलला अन् हाताचा पंजा तुटून बाजूला पडला; सोलापूर जिल्ह्यातील घटना

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा गाठ आमच्याशी आहे; मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारला थेट इशारा; ‘त्या’ विजयावरही संशय व्यक्त करत थेट निशाणा

May 6, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

मंगळवेढ्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सीसीटीव्हीवर कापड झाकून वाळूची उघड दरोडेखोरी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

May 6, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्याला न्यायालयाने चारली धूळ! ५ वर्षे सक्तमजुरी आणि जबर दंड; ​पंढरपूर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; लाच मागाल तर थेट तुरुंगात जाल

May 6, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! प्रसूतीसाठी दाखल पत्नीला डबा द्यायला निघालेल्या पतीचा अपघातात अंत; जन्माला आलेल्या मुलाचे तोंडही पाहता आले नाही

May 5, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो संधी सोडू नका! महाडीबीटीवर अर्ज करा आणि मिळवा मोफत व सवलतीच्या दरात बियाणे, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य; असा करा अर्ज

May 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा