mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार तानाजी सावंतांचा ठाकरेंना झटका; सोलापूर शिवसेनेचा मोठा गट मुख्यमंत्री शिंदेंच्या गोटात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 11, 2022
in राजकारण, सोलापूर
मोठी बातमी! शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत भाजपत जाण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंत यांना पायउतार केले आहे. त्याला चोवीस तास होण्याआधीच तानाजी सावंतांनी शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

त्यांनी सोलापूर महापालिकेतील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, इतर चार-पाच माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी यांना फोडून शिंदे गटात सामील करून घेतले आहे.

खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुसरा गट झाला आहे.

शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांचा मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा असल्याने शिवसेना नेमकी कोणाची, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची सात रस्ता येथील विश्रामगृहात बैठक पार पडली.

त्याचवेळी माजी मंत्री, तत्कालीन संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी जबरदस्त राजकीय खेळी करत सोलापूर महापालिकेतील काही माजी पदाधिकारी,

पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील पक्षाचे पदाधिकाऱ्यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भेट घडवून त्यांना पाठिंबा जाहीर करायला लावला.

त्यामुळे सोलापूरच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. शिवसेनेत नगरसविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मोठी मदत केली होती. त्यामुळे आम्ही त्यांना मुख्यमंत्री झाल्याच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो, असे त्यातील काहींनी सांगितले.

पण, आगामी काळात पक्षांतर्गत राजकारणामुळे ते पदाधिकारी निश्चितपणे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दिसतील, अशीही चर्चा आहे.

माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे, अमोल शिंदे, माजी सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, माजी नगरसेवक मनोज शेजवाल, उमेश गायकवाड,

प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, माजी शहरप्रमुख हरीभाऊ चौगुले, माजी परिवहन सभापती तुकाराम मस्के, माजी तालुकाप्रमुख चरण चौरे, संजय कोकाटे, नागनाथ क्षीरसागर,

सोमेश क्षीरसागर, पंढरपूर विभागाचे उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख आदी उपस्थित होते. त्या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचेही बोलले जात आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत आणि शिवसेनेतून आता राष्ट्रवादीत जाण्यास इच्छूक असणारे माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी त्यांच्या काही समर्थक नगरसेवकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर येथे भेट घेतली.

त्यावेळी काहींनी उघडपणे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. पण, महेश कोठे यांनी आपण सध्यातरी राष्ट्रवादी प्रवेशावर ठाम असल्याचे सांगितले.

मात्र, पुढे भविष्यात राजकीय परिस्थिती पाहून काहीही होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.(स्रोत:सरकारनामा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.तानाजी सावंत

संबंधित बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
Next Post
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

ताज्या बातम्या

सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

विश्वासार्हता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर ‘श्रीकृपा अर्बन’ प्रगतीपथावर राहील: आमदार समाधान आवताडे यांचे गौरउद्गार

March 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

March 20, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 20, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..