टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
दरम्यान, परिचारक समर्थकांनी या निवडणुकीसाठी विचार-विनिमय बैठक आयोजित केली होती.या बैठकीमध्ये या समर्थकांनी आम्हाला गृहीत धरू नये असा गर्भित इशारा दिला होता.
दरम्यान परिचारक गटाचे प्रमुख नेते युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांनी राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष व आमदार समाधान आवताडे यांना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आमदार प्रशांत परिचारक यांनी दामाजी कारखान्याचे संस्थापक चेअरमन मारवाडी वकील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमदार समाधान आवताडे यांच्याबरोबर उपस्थिती दर्शवली.
यामुळे दामाचीच्या सभासदा मधून कारखान्यावरील कामगार मधून अवताडे व परिचारक एकत्र राहणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
मुळातच अवताडे व परिचारक हेच एक विचाराचे आहेत. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी विकास कामे करणे दर्जेदार कामे करणे कोणतेही काम असो काँक्रिट करणे भले रस्त्याचा असो की राजकीय राजकारणातला असून कोणती खेळी प्रभावीपणे होत असल्यामुळे
जिल्ह्याच्या राजकारणात आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे यांचे राजकीय महत्त्व त्यांनी स्वतःच्या कर्तुत्वाने वाढवलेले आहे.
जिल्ह्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केलेले आहे यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघ आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे ही जोडगोळी बराच काळ एकत्र राहणार असल्याचे दिसत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज