mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोटनिवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस संचारबंदी शिथिल; ‘हा’ आदेश मात्र कायम राहणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 16, 2021
in सोलापूर
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान आहे. मतदान करण्यासाठी मतदारांना जाणे- येणे सुलभ व्हावे , यासाठी १६ एप्रिलच्या सकाळी सात वाजल्यापासून ते १८ एप्रिलच्या सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी शिथील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्याने 15 एप्रिल ते 1 मे दरम्यान कडक संचारबंदी लागू केली आहे. नव्या निर्बंधानूसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी काल रात्री उशिरा आदेश काढले आहेत.

होम डिलेव्हरी व पार्सल सेवेला काही प्रमाणात सूट दिली आहे. महापालिका हद्दीतील बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल्सला रात्री दहापर्यंत होम डिलेव्हरी आणि पार्सल सेवेच्या अनुषंगाने परवानगी दिली आहे.

ऑर्डर देण्याच्या उद्देशाने किंवा ऑर्डर घेऊन जाण्याच्या उद्देशाने कोणीही भेट देऊ नये, असे आदेशातून स्पष्ट केले आहे. तर रूग्णांची सेवा करणाऱ्यांना सवलत देण्यात आली आहे.

कारखाने/उद्योगातील एखादा कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यास त्यांच्या संपर्कातील सर्व कामगारांचे अलगीकरण कारखाना प्रशासनाला स्वखर्चाने करावे लागणार आहे.

पाचशेपेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखाना किंवा उद्योगाच्या ठिकाणी स्वतःचेअलगीकरण केंद्र स्थापन करावे लागणार आहे. एखादा कामगार कोरोनाबाधित आल्यास हा कारखाना/युनिट पूर्ण निर्जंतुक होईपर्यंत बंद ठेवले जाणार आहे.

सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार हे एकत्रित बसून सेवा देण्यासाठी बंद करण्यात आले आहेत. होम डिलिव्हरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याची सूचनाही या आदेशात करण्यात आली आहे.

सार्वजनिक वाहतुकीसाठी ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हर व दोन प्रवासी, टॅक्‍सी/चार चाकी वाहनांमध्ये ड्रायव्हर व वाहनाच्या 50 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक, बस वाहतुकीसाठी आरटीओने दिलेल्या पासिंगनूसार पूर्ण क्षमतेने वाहतुकीस परवानगी दिली आहे.

चारचाकी/टॅक्‍सी वाहनांत जर कोणत्याही एका व्यक्तीने मास्क घातला नसेल तर त्या टॅक्‍सी चालकाला व मास्क न घालणारे व्यक्तीला प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. रस्त्याच्या कडेच्या खाद्य विक्रेत्यांनी रस्त्याच्या ठिकाणी ग्राहकांना खाद्यपदार्थ खाण्यास देऊ नये.

ग्रामीण भागासाठी फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत तर महापालिका हद्दीत सकाळी 7 ते सायंकाळी 6 यावेळेत सर्व दिवशी देता येणार आहे.

या कालावधीत सिनेमा हॉल, नाट्यग्रह, सभाग्रह, मनोरंजन पार्क, व्हिडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क, क्‍लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, चित्रपट/सिरियल/जाहिरातीचे चित्रीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे.

धार्मिक स्थळांमध्ये दैनंदिन नित्य उपचार सुरु राहतील परंतु बाहेरील व्यक्तींना मनाई असणार आहे. शाळा व महाविद्यालय बंद राहणार असून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. केश कर्तनालय, स्पा, सलून व ब्युटी पार्लर ही दुकाने बंद राहणार आहेत.

पोटनिवडणुकीसाठी आज संचारबंदी शिथिल
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीसाठी बंदिस्त ठिकाणी दोनशे व्यक्तींना अथवा सदर जागेचा 50 टक्के क्षमतेपर्यंत जी संख्या कमी असेल इतक्‍या व्यक्तींच्या उपस्थितीत सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सभा व मेळाव्याच्या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी/कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे. या मतदार संघा निवडणुकीच्या कामासाठी व प्रचारासाठी संचारबंदी शिथील करण्यात आली आहे.

विवाहासाठी 25 तर अंत्यविधीसाठी 20 जण
विवाह स्थळ, मंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांचे अभ्यंगतांचे लसीकरण अथवा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आवश्‍यक आहे. लसीकरण अथवा कोरोना निगेटीव्हचे प्रमाणपत्र नसल्यास अशा व्यक्तीला एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.

विवाहस्थळ अस्थापनांना दहा हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. लग्नासाठी जास्तीत जास्त 25 जणांना तर अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोटनिवडणुकमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

July 2, 2026
कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

July 1, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

महिला सक्षमीकरणासाठी ‘वीरश्री’ पतसंस्थेचे मोठे पाऊल; महिला उद्योजकांना केवळ ‘इतके’ टक्के व्याजदराने कर्ज, विविध ठेव योजनांचाही शुभारंभ

July 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ ७ तालुक्यांचे भाग्य बदलणार?

June 30, 2026
मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

June 29, 2026
मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भक्तांना मोठा धक्का! करणी-बाधा उतरवणारा मंगळवेढ्यातील ‘बिरा महाराज’ निघाला गांजा तस्कर; एनडीपीएस कायद्यान्वये पोलिसांची मोठी कारवाई

June 26, 2026
मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

मंगळवेढ्यात भव्य ओपन जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचा थरार; ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ; साप्ताहिक रणयुग टाईम्सचा पुढाकार

June 25, 2026
Next Post
रोहित पवारांच्या संपर्कातील मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील ‘तो’ नेता कोणता ?

मंगळवेढा-पंढरपूर निवडणुकीवर ठरणार सरकारचे भवितव्य; भाजप-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सिंघम रिटर्न! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; बाजारपेठेतून सुटे तेल गायब, बनावट दूध, पनीर विक्रेते रडारवर; डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; भेसळखोरांचे धाबे दणाणले

July 2, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऐतिहासिक मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?

July 2, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

शेतजमीन नसली, तरीही राबणारी महिला ‘शेतकरी’च; महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर; कोणाला मिळेल दर्जा? कुठे करावा अर्ज?

July 2, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

July 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​सणाच्या नावाखाली अश्लीलता! मंगळवेढ्यात विनापरवाना महिलांचे डान्स प्रोग्राम आयोजित करणाऱ्या ७ जणांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई

July 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा