mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा-पंढरपूर निवडणुकीवर ठरणार सरकारचे भवितव्य; भाजप-राष्ट्रवादीत काट्याची टक्कर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 16, 2021
in राजकारण, मंगळवेढा
रोहित पवारांच्या संपर्कातील मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील ‘तो’ नेता कोणता ?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

एकाबाजूला कोरोनाचा संकटरुपी यमराज आ वासून उभा असताना दुसऱ्या बाजूला सर्व नियम पायदळी तुडवत सुरु असलेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी सायंकाळी थंडावल्या.

गेले काही दिवस कोरोना काळात हजारोंच्या उपस्थितीत प्रचारसभा राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून घेत आपली संपूर्ण ताकद लावायचा प्रयत्न झाला आहे.

गुरुवारी अखेरच्या दिवशी मात्र भाजपने एकही सभा न घेता दिलासा दिला असला तरी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवेढ्यात शेवटच्या प्रचारसभा घेतल्या. दोन्ही पक्षांची ताकद पणाला लागली असल्याने येथील प्रचारातही एकमेकांवर बरेच तोंडसुख घेण्यात आले.

असे असले तरी ही निवडणूक दोन्ही पक्षाला सोपी नसून अतिशय काट्याची टक्कर होणार असे चित्र दिसत आहे. अजित पवार यांनी केलेल्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देताना सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत जास्त गमजा करू नका असे सुनावले होते.

गुरुवारी सायंकाळी मंगळवेढ्याच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे शेतकरी वाटतात का? अशा शब्दात त्यांना पुन्हा डिवचले. तर मंगळवेढ्याच्या सभेला येण्यापूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी थेट जतपर्यंत फिरून मंगळवेढ्याला कसे पाणी देता येईल याचा अभ्यास करून भाषणात पाणी देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दाखवले.

मतदारांना आकर्षित करण्याचा असा प्रयत्न दोन्ही बाजूने झाला असला तरी वर्षानुवर्षे पाण्यासाठी वणवण करणारी जनता मते कोणाला देणार हे आता उद्या 17 एप्रिल रोजी मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांचा मोठा फटका बसणार आहे.

यासोबत वंचित बहुजन आघाडी व इतर काही पुरोगामी पक्षांकडून राष्ट्रवादीला कात्री बसू शकते. भाजपचे उमेदवार समाधान अवताडे याना त्यांचा चुलत भाऊ सिद्धेश्वर अवताडे यांचा मोठा फटका मंगळवेढ्यात बसणार असून ही मते थेट समाधान अवताडे यांच्या मतांतून वजा होणार आहेत.

या सर्व साठमारीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांना वडिलांच्या निधनाची सहानुभूती मिळणार असून समाधान अवताडे यांना मंगळवेढ्यात भूमीपुत्र असल्याचा लाभ होणार आहे. या निवडणूक प्रचारात अजित पवार चक्क चार दिवस एका मतदारसंघात तळ ठोकून राहिल्याने या निवडणुकीची सर्व सूत्रे अजित पवार आणि जयंत पाटील यांचेकडे राहिली होती.

ज्या बारामती या अजित पवारांच्या मतदारसंघात ते केवळ एक शेवटची सभा घेतात ते अजित पवार या निवडणुकीत गावोगावी जात नेत्यांच्या गाठीभेटीवर जास्त भर दिला आणि त्यामुळेच अनेक नेत्यांना त्यांनी राष्ट्रवादीत आणून भगिरथ भालके यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला.

भाजपच्या बाजूने धनगर नेते गोपीचंद पडळकर आणि राम शिंदे यांनी राष्ट्रवादीला जेरीस आणत त्यांचा मोठा मतदार फोडण्याचे काम केले. आता अजित पवार जयंत पाटील यांनी उभी केलेली ताकद सरस ठरणार कि देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी उभी केलेली ताकद सर्रास ठरणार हे 2 मे च्या निकालात दिसून येणार आहे.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोटनिवडणुकमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

June 28, 2022
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढयात आज गुणवंतांचा सत्कार; करिअर विषयक मार्गदर्शन शिबीर

June 28, 2022
बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

June 28, 2022
मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन

मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन

June 28, 2022
दामाजीचा रणसंग्राम! आवताडे गटाची एक जागा बिनविरोध, 281 जणांनी माघार घेतली; यांच्यात होणार थेट लढत

दामाजीचा रणसंग्राम! आवताडे गटाची एक जागा बिनविरोध, 281 जणांनी माघार घेतली; यांच्यात होणार थेट लढत

June 27, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजीच्या सत्ताधारी पॅनेलला कोण आव्हान देणार, परिचारक समर्थकांचे अर्ज मोठ्या प्रमाणात शिल्लक; आज होणार चित्र स्पष्ट

June 27, 2022
नोकरीची संधी! मंगळवेढ्यात जॉब पाहिजे; मोठ्या कंपनीत करा नोकरी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

गोल्डन चान्स! मंगळवेढ्यातील मोठ्या ज्वेलर्स कंपनीत नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

June 27, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

फळ मिळाले! शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सोलापुरातील ‘या’ दोघांची नियुक्ती; पक्षाशी एकनिष्ठता आली कामी

June 26, 2022
Next Post

नाना पटोलेंचा बॉम्ब! मंत्री दत्ता भरणे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढवलं

ताज्या बातम्या

अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

June 28, 2022
ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

June 28, 2022
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढयात आज गुणवंतांचा सत्कार; करिअर विषयक मार्गदर्शन शिबीर

June 28, 2022
बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

June 28, 2022
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

संभ्रम अवस्था! विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार पालख्यांच्या स्वागताला मामा की बापू?

June 28, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..