टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहीवडी येथील विद्यामंदिर प्रशालेचे शिपाई यांचे नाव शालार्थ प्रणाली व वेतन देयकात समाविष्ट करण्याचा आदेश असताना आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी
प्रशालेचे मुख्याध्यापक बाबासो धोंडीबा रेड्डी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी अर्जुन सोनवणे (वय ३१) हे लक्ष्मीदहीवडी येथील विद्यामंदिर प्रशालेत दिनांक १ जून २०१९ पासून शिपाई पदावर कार्यरत आहेत. ते अनुकंपा तत्त्वावर लागले आहेत.
मान्यतेनुसार शिक्षण उपसंचालक पुणे यांनी फिर्यादीचे नाव शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यासाठी दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी परवानगी दिली होती.
शाळेच्या लॉगिनला नाव समाविष्ट करून वेतन काढण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांची असताना त्यांनी तसे केले नाही. दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी
फिर्यादीचे नाव वेतन देयकात समाविष्ट करून त्यांचे वेतन अदा करावे, असा आदेश मुख्याध्यापकांना दिला होता. मात्र, या आदेशाची अवहेलना केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत सोनवणे यांनी म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज