टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे
मंगळवेढा येथील खोमनाळ रोडवरील समर्थ लॉन येथे आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता विचार विनिमय बैठक आयोजित केल्याची माहिती श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक औदुंबर वाडदेकर यांनी दिली.
या बैठकीसाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक सोलापूर लोकसभा माहितीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट
संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहेत. विविध पक्षांकडून प्रचाराला जोर दिला जात आहे. तसेच प्रचारातील रंगत आता वाढत आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान अलीकडेच पूर्ण झाले. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या शुक्रवारी होणार आहे.
दरम्यान, सोलापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता सोलापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे.
वंचित आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर मतदारसंघातून अक्कलकोटचे गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली होती. सोलापूरसाठी गायकवाड यांची उमेदवारी नवखी होती. त्यावेळी त्यांच्या उमेदवारीची खूप चर्चा झाली होती. गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरला होता.
मात्र, त्यानंतर त्यांनी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आज सोलापूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या माघारीमुळे सोलापूर मतदारसंघात आता काँग्रेसच्या प्रणिती आणि भाजपचे सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज