टीम मंगळवेढा टाईम्स ।
तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी राजा मागे राहू नये म्हणून शेतकऱ्यांना सर्व सोयी व सुविधा देण्याचा आपला प्रयत्न असून त्या दृष्टीने आपण कार्यरत असल्याचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सिध्देश्वर आवताडे यांनी सांगितले.
आवताडे म्हणाले, शेती मालाला दर मिळत नव्हता.मका, हरभरा यांना दर मिळावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करून हरभरा व मका हमीभाव केंद्र सुरु केले.
या माध्यमातून शेतकऱ्यांना ५०० ते १००० रुपये क्विंटलला जादा दर मिळाला.कृषी उत्पन्न बाजार समिती येथे डाळिंब सौदे सुरु केल्याने पंढरपूर व सोलापूर या सारख्या ठिकाणी जाण्याचा त्रास कमी झाला.
मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी अधिक समृध्द पाहिजे.शेतकऱ्याला बाजार भावाची प्रत्येक बातमी घर बसल्या मिळायला हवी.
यासाठीही आपला प्रयत्न असून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मला विधानसभेत पाठवावे असे आवाहनही सिध्देश्वर आवताडे यांनी केले आहे
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज