टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत प्रचारासाठी केंद्रीय मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री व अन्य नेते या मतदारसंघात येऊन जनतेचे,शेतकऱ्यांचे कल्याण करु म्हणू लागले आहेत. इतक्या दिवस झोपी गेलेले हे नेते आता या मतदारसंघात येऊन जनतेचे प्रश्न सोडवू.म्हणत आहेत.
ज्या दोन्ही उमेदवार चेअरमनने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांची ऊसबील थकीत ठेवतात. कामगारांची पगारी देत नाहीत. अशा उमेदवारांसाठी हे मत मागायला आले आहेत. जनता हुशार आहे.
या चेअरमनने केलेले पाप आता जनता मतदानाच्या रुपाने उघड केल्याशिवाय रहाणार नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करणारे हे चेअरमन ला शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे.
पस्तीस गावच्या पाण्यासाठी कधी अंदोलन केले नाही. ते भूमीपुत्र म्हणू लागले आहेत. भूमीपुत्र कधी शेतकऱ्यांची ऊसबील अडवून ठेवत नसतो.त्यांचे सभासदत्व रद्द करत नसतो.असे हे चेअरमन दादा आता आमदारकीला मत मागत आहे.
विठ्ठल साखर कारखान्याचे दुसरे दादा कामगारांचे पगारी बुडवणारे ,शेतकऱ्यांचे ऊसबील थकवून त्यांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. असे हे चेअरमन दादा वारसदार म्हणून आमदारकी मिळवू पहात आहे. अशा लबाड,फसव्या नेत्यांना या निवडणुकीत पराभव करा.
मला एकवेळ जनतेची सेवा करण्यासाठी, पस्तीस गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम करण्यासाठी, बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी फक्त एकदाच संधी द्या.
शिट्टी समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने निवडून द्या. असे आवाहन सौ.शैलाताई गोडसे यांनी तळसंगी,मरवडे ,येड़्राव,येथील प्रचार सभेत सौ.शैलाताई गोडसे यांनी मतदारांना केले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज