mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! ‘पवार क्षेपणास्त्र’ तयार आहे; कधीही ‘महाराष्ट्रावर’ ते कोसळू शकतं

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, मनोरंजन, राजकारण
सावधान! ‘पवार क्षेपणास्त्र’ तयार आहे; कधीही ‘महाराष्ट्रावर’ ते कोसळू शकतं

 

मधुकर मुळूक । महत्वाच्या कृषी विषयक विधेयकावर शरद पवारांची राज्यसभेतली अनुपस्थिती व त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदारांचा सभात्याग ही कृती, बरंच काही सांगून जाते. महाराष्ट्र सरकारचं भवितव्य टांगणीला लागतं की काय अशीच स्थिती आहे. खासदार संजय राऊत लोकशाही आघाडी सरकारच्या टायरमध्ये कितीही हवा भरत असले तरीही, पवार-मोदी यांची जवळीक धोक्याची घंटा वाजवतेय हे गृहित धरायला जागा आहे. 

मोदी सरकारचे लोकसभेत बहुमत आहे. परंतु राज्यसभेत त्यांची दमछाक होते. कृषिविषयक बिल राज्यसभेत मंजूर करून घेण्याकरिता छोट्या-मोठ्या पक्षांची गरज मोदींना लागत असते. ‘370 कलम हटाव’ च्या वेळीही राष्ट्रवादीने अप्रत्यक्ष मोदी-शहांना मदतच केली होती. आत्ताही कृषिविषयक बिल पास होताना राष्ट्रवादीचा सभात्याग भाजपा सरकारच्या पथ्यावर पडलेला आहे. 

शरद पवार – नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीची नाळ घट्ट होत चालली आहे. अर्थात त्या घट्ट मैत्रीला महाराष्ट्राची किनार लाभलेली आहे. ‘शरदराव आप एकबार ठाकरे परिवार को आसमान दिखाओ, बाकी सब काम मुझ पर छोड दो, हे सांगण्याचाच प्रकार काल राज्यसभेत झाला. 

शरद पवार संसदीय कामकाजात अनुपस्थित राहात नाहीत. काल तर कृषिविषयक महत्वाचे विधेयक होते. पवार 10 वर्षे कृषीमंत्री होते. त्यांनीच या देशाचे कृषि उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवून नवा इतिहास रचला होता. 

मग ऐनवेळी स्वतः अनुपस्थितीत व आपल्या पार्टीचे खासदार सभात्याग करतात, याचा अर्थ काय घ्यायचा? अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करावी हा तर नव्हता? या सभात्यागाचे दुष्परिणाम महाराष्ट्र सरकारवर होणार आहेत. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं की, राज्य सरकार पाडायाची व्यृहरचना काही प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी करत आहेत. शरद पवार मग गप्प का आहेत? त्यानंतर सारवासारव करण्यासाठी संजय राऊत धडपडताहेत. याचा अर्थ ‘सब कुछ अलबेल है’ असं वाटत नाही.

इतिहास काय सांगतो?

शरद पवार यांनी ज्यांना ज्यांना हात दिला, त्या त्या सर्व घराण्यांना एक तर निवृत्ती घ्यावी लागली किंवा राजकीय आखाड्यातून संपावं लागलं. स्व. वसंतदादा पाटील यांचं घराणं जवळपास संपल्यातच जमा आहे. 

लातूरचे देशमुख घराणे असून नसल्यागत आहे. दोन आमदार, एक मंत्री एवढ्यापुरते सिमित आहे. राणे घराणे होत्याचे नव्हते झालेय. विखे – काळे – गडाख घराणे कुठेच दिसत नाही. मोहिते घराणं कधीच बरबाद झालंय. भुजबळ-नाईक पवारांच्या लेखी काडीमात्र आहेत. उरले होते ठाकरे घराणे. जोवर बाळासाहेब होते, तोवर ठाकरे घराण्याकडे कुणी तिरक्या नजरेने सुद्धा पहात नव्हते. आता ती कालची कंगना, अरे-तुरे करतेय. 

पवारांनी तर रिमोट कंट्रोलच हातात घेतलंय. ठाकरे घराणे साईडींग केलं की ‘पवार ’हे एकमेव नाणे वाजेल. सोबत मोदी आले तर देशात आणि महाराष्ट्रात ‘पवार घराणे’ सत्तेत येवू शकेल. म्हणूनच राज्यसभा सभात्यागातून ‘पवार क्षेपणास्त्र’ महाराष्ट्राच्या मुळावर येईल की काय अशी शंका बळावली आहे.

शरद पवार ही अशी जादू आहे की, केव्हा काय घडेल हे सांगणं कठीण असतं. मुंबई ‘सी लिंकचा उड्डाणपूल’ तयार झाला. सर्वाना काय नाव द्यावे सुचत नव्हते. व्यासपीठावर सोनिया गांधी होत्या. 

राष्ट्रवादीच्या जन्माआधी सोनिया-पवार यांची ‘परदेशी वंशाच्या बाई’ या विषयावर खडाजंगी सुरू होती. त्यातूनच बाईंनी शरद पवारांना पक्षातून निलंबित केले होते. असे असतानाही केवळ बाई खुश व्हाव्यात आणि मागे झालं ते विसरा हे सांगण्यासाठी पवारांनी ‘सि लिंक’ला राजीव गांधी यांचं नाव द्या, असं सुचवलं. कारण राजीव गांधींचा जन्म मुंबईत झाला होता. 

सांगण्याचा मुद्दा एवढाच की पवारांना राजकारणाचे खाचखळगे कसे भरायचे याचे उत्तम ज्ञान असल्याने महाराष्ट्रातही भुकंप होवू शकतो. 

‘पवार-मोदी’ एक झाल्यास ‘ठाकरे घराणे’ आपोआप साईडींग होवू शकते. ते होवू नये म्हणून दिल्लीच्या कुरुक्षेत्रावर ‘संजय राऊत नावाचा शिवसेना दूत’ ‘6 जनपथ’वर घिरट्या घालताना दिसतो. ‘6 जनपथ’ हे पवारांचे दिल्लीचे निवासस्थान आहे.

महाराष्ट्र सरकार ‘राम भरोसे’ चालले आहे हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. 

उद्धव ठाकरे यांना सभागृहाचा, प्रशासनाचा अनुभव नसताना ते काम चांगलं करतात असं वाटत असलं तरी वाढता कोरोनाचा प्रभाव, मराठा आरक्षणाची खदखद, शेतकर्‍यांचा आक्रोश, तरुणांची ससेहोलपट, थंडावलेला उद्योग-व्यवसाय, चित्रपट सृष्टीवरचे ड्रग संकट, पवारांच्या न समजणार्‍या खेळ्या हे सर्व ठाकरे सरकारला परवडणारं नाही. “पवार क्षेपणास्त्र तयार आहे. कधीही महाराष्ट्रावर ते कोसळू शकतं.”

प्रहार/मधुकर मुळूक

संपादक -पत्रकार

दैनिक वृत्तानंद, ठाणे

9821540607

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 9, 2026
​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
Next Post
मंगळवेढेकरांसाठी महत्त्वाची बातमी! बँक ऑफ इंडियानंतर आता ‘ही’ बँक अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार

मंगळवेढेकरांसाठी महत्त्वाची बातमी! बँक ऑफ इंडियानंतर आता 'ही' बँक अनिश्‍चित काळासाठी बंद राहणार

Comments 1

  1. baban bargaje says:
    6 years ago

    खूप छान लेख लिहिला आहे सर

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 7, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 6, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा