टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरण सध्या १०४ टक्के (११९.३० टीएमसी) भरले असून पूर नियंत्रणासाठी धरणातून ४ ऑगस्टपासून भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. मागील ३७ दिवसांत धरणातून तब्बल ९३ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले.
पण, काही दिवसांपासून पाऊस बंद झाल्याने भीमा नदीत सोडले जाणारे पाणी काल बुधवारी बंद करण्यात आले आहे. धरणाचे १६ दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
सध्या उजनीतून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी १७५ क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ८० क्युसेक, बोगद्यातून २०० क्युसेक, कालव्यातून (कॅनॉल) १६०० तर विद्युत प्रकल्पासाठी १६०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
नदीतून पाणी सोडणे आता पूर्णपणे बंद झाले आहे. सध्या धरणातून सोडले जाणारे पाणी साधारणतः १० ऑक्टोबरपर्यंत जैसे थे राहणार आहे. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून विहिरी, गाव तलाव, मध्यम, लघू प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.
त्यामुळे आता जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत शेतीसाठी पहिले आवर्तन सोडले जाईल. त्यानंतर उन्हाळा संपेपर्यंत आणखी दोन आवर्तने शक्य आहेत.
धरणातील पाणीसाठा उणे १५ ते २० टक्के झाल्यावर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही. यंदाच्या पावसाळ्यात उजनी ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांची उन्हाळ्यातील चिंता दूर झाली आहे.
तीन उपसा सिंचन योजना यंदा कार्यान्वित
शिरापूर व एकरुख उपसा सिंचन योजना जून २०२५ पर्यंत कार्यान्वित होईल, अशी आशा आहे. तत्पूर्वी, दोन्ही योजनांचे प्रात्यक्षिक होईल. दुसरीकडे देगाव कालव्याचे उर्वरित काम ऑक्टोबरअखेर पूर्ण होईल. २८ किमी या कालव्याचे प्रात्यक्षिक साधारणतः नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये होणार आहे.
त्यापुढे चार हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्यासाठी वितरण व्यवस्था केली जात आहे. त्यानंतर पुढे पाणी लिफ्ट करून नेले जाणार असून त्याचेही काम आगामी काळात पूर्ण होऊन अंदाजे १६ हजार हेक्टरला पाणी मिळणार आहे. सध्या जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर क्षेत्राला उजनीतून थेट पाणी मिळते.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज