टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र जलसंपदा विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळअंतर्गत ही भरती केली जाणार आहे. राज्य सरकारच्या मोठ्या विभागात काम करण्याची ही उत्तम संधी आहे.
या नोकरीबाबत जाहिरात जलसंपदाविभागाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.कनिष्ठ अभियंता या पदासाठी नोकरीची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा जलसंपदा विभागातील खालील पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा.
सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता श्रेणी-२, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपविभागीय अधिकारी या पदासाठी अर्ज करु शकतात. पुणे शहरात तुम्हाला नोकरीसाठी जावे लागेल.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२४ आहे. जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता, उजनी कालवा, विभाग क्रं. ९ मंगळवेढा-४१३३०५ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
तसेच तुम्ही ujjanimangalwedha@gmai.com या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवू शकतात. या नोकरीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. मुलाखतीची माहिती तुम्हाला मेलद्वारे देण्यात येईल.
सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेतदेखील विविध पदांसाठी भरती सुरु आहे. तब्बल १८५६ पदांसाठी ही भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच ९ सप्टेंबर आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज