टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरात 2008 साली पहिला मास्टर प्लॅन आला त्यात अनेक नागरिक बेघर झाले. तोही सद्यस्थितीला अर्धवट असल्याचे बोलले जात आहे. आता दुसरा मास्टर प्लॅन लादला जात असून या नवीन विकास आराखड्याच्या निषेधार्थ मंगळवेढा आज बंद ठेवण्यात येणार आहे.
पहिल्या मास्टर प्लॅन मध्ये ज्या नागरिकांची घरे, दुकाने गेली आहेत त्यांना प्रशासनाने बेघर केले त्यांना अत्यंत तोडकी मदत माथी मारली होती त्यातील काहीजण न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले आहेत.
अशा लोकांना प्रशासनाने पैशा ऐवजी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
मंगळवेढा व्यापारी महासंघाच्यावतीने प्रस्तावीत शहर विकास आराखडा रद्द करावा याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा नगराध्यक्ष यांना आज देण्यात येणार आहे.
मंगळवेढा शहरातील सर्व व्यापारी नागरिक, सर्व राजकिय पक्षाचे वतीने हे निवेदन देण्यात येणार आहे.
मंगळवेढा शहराकरीता जो प्रस्तावित विकास आराखडा आहे त्यास तमाम नागरिक व व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे.
जेथे एकही वाहन जात नाही अशा ठिकाणी १२/१५ मीटर रस्ता प्रस्तावित केला करता आहे, ज्या रस्त्याचे केवळ बाजूस नगरपालिकेच्या मिळकती आहे. त्या सोडून बाजूच्या खाजगी मिळकती पाडण्याचे आयोजन आहे.
मंगळवेढा शहरातील जवळजवळ सर्वच कार्यालये गावाबाहेर गेलेली आहेत. मंगळवेढा शहरातील व्यापार उध्वस्त झाला आहे.
यापुर्वीचे श्री संत दामाजीपंत पुतळा ते मुरलीधर चौक हा रस्ता रूंदीकरण पूर्ण झालेले नाही. तरी वरील सर्व बाबींचा विचार प्रस्तावित विकास आराखडा रद्द करावा असे त्या निवेदनात म्हटले आहे.
आज मंगळवेढा बंद
मंगळवेढा शहरातील प्रस्तावित विकास आराखड्यास विरोध दर्शविण्यासाठी निषेध म्हणून आज मंगळवेढा व्यापारी महासंघ व सर्व नागरीकांचे वतीने मंगळवेढा बंदचे आवाहन केले आहे.
या बंदला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे सदर बाबतीत निवेदन देण्यासाठी सर्व नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी बहुसंख्येने सकाळी दहा वाजता श्री संत दामाजीपंत पुतळ्याजवळ जमावे असे आवाहन करण्यात आले असून उपविभागीय अधिकारी
तथा नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात येणार असून तरी सर्व नागरिकांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज