mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सावधान! विना OTP ही उडू शकतात खात्यातून पैसे, फोनमध्ये शिरतोय नवीन वायरस, यापासून कसं वाचाल? ही गोष्ट लक्षात ठेवा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 22, 2026
in राज्य, राष्ट्रीय
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

आजच्या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन हे केवळ संवादाचे साधन राहिले नसून ते आपले चालते-फिरते बँक खाते झाले आहे. खिशातून पाकीट चोरीला जाण्याची भीती आता कमी झाली असली, तरी मोबाईलमधील एका ‘क्लिक’मुळे तुमची आयुष्यभराची कमाई क्षणात गायब होऊ शकते, अशी भीती आता निर्माण झाली आहे.

गुन्हेगार आता तुमच्या घरापर्यंत येत नाहीत, तर ते तुमच्या खिशात असलेल्या फोनमध्ये चोरपावलांनी शिरत आहेत.

सध्या अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी एक अत्यंत धोक्याची घंटा वाजली आहे. ‘Albiriox’ नावाचा एक नवीन आणि अत्यंत घातक ‘सुपर व्हायरस’ (मॅलवेअर) सध्या धुमाकूळ घालत असून, त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो तुमच्या परवानगीशिवाय आणि विना OTP तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो.

काय आहे हा ‘Albiriox‘ व्हायरस आणि तो कसा काम करतो?

सायबर सुरक्षा संस्था ‘क्लीफी’ (Cleafy) ने या नवीन धोक्याची पुष्टी केली आहे. हा व्हायरस इतर सामान्य व्हायरसपेक्षा वेगळा आहे कारण:

विना OTP व्यवहार : खरंतर कोणत्याही ट्रान्झॅक्शनसाठी आपल्याला ओटीपी येतो, पण हा व्हायरस तुमच्या फोनच्या ‘एक्सेसिबिलिटी सर्व्हिसेस’चा ताबा घेतो आणि बँक ॲपमध्ये घुसून परस्पर पैसे ट्रान्सफर करतो. युजरला साधा अलर्टही मिळत नाही. धक्कादायक म्हणजे हा व्हायरस आता ‘मॅलवेअर-ॲज-अ-सर्व्हिस’ (MaaS) मॉडेलवर विकला जात आहे. म्हणजेच कोणताही गुन्हेगार ठराविक पैसे देऊन हे टूल विकत घेऊ शकतो आणि लोकांवर हल्ले करू शकतो.

तुमच्या फोनमध्ये हा व्हायरस येतो तरी कसा?
हॅकर्स थेट तुमच्या फोनवर हल्ला करत नाहीत, तर ते तुम्हाला जाळ्यात ओढतात:

1. बनावट ॲप्स: व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर तुम्हाला एखाद्या फाईलची लिंक येते (उदा. मोफत रिचार्ज किंवा स्वस्त वस्तूंची ऑफर). ही फाईल एखादे अधिकृत ॲप असल्यासारखी दिसते.

2. अननोन APK फाईल्स: जेव्हा तुम्ही एखाद्या लिंकवरून APK फाईल डाऊनलोड करता, तेव्हा हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये गुपचूप शिरतो.

3. परवानगीचा गैरवापर: एकदा का तुम्ही ‘Install from Unknown Sources’ ला परवानगी दिली की, बॅकग्राउंडमध्ये हा व्हायरस तुमचे बँकिंग, पेमेंट आणि क्रिप्टो ॲप्स आपल्या नियंत्रणाखाली घेतो.

400 हून अधिक बनावट ॲप्स सक्रिय
संशोधकांनी आतापर्यंत असे 400 पेक्षा जास्त बनावट ॲप्स शोधले आहेत जे विशेषतः बँकिंग सेवा वापरणाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. हा व्हायरस तुमचे पासवर्ड चोरी करण्याऐवजी थेट तुमच्या खात्याचा ताबा घेतो, ज्यामुळे तुम्हाला साधी लॉगिन सूचनाही मिळत नाही.

स्वतःला सुरक्षित कसे ठेवायचे?

तुमचे बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी खालील गोष्टींचे पालन करणे आता अनिवार्य झाले आहे. त्यामुळे कोणतेही ॲप कधीही अनोळखी लिंक, मेसेज किंवा वेबसाईटवरून डाऊनलोड करू नका.

फक्त ‘Google Play Store’ चाच वापर करा.
Settings बदला: तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘Install Unknown Apps’ हा पर्याय नेहमी बंद ठेवा.

Google Play Protect: तुमच्या फोनमधील प्ले प्रोटेक्ट सेटिंग नेहमी ‘On’ ठेवा, जेणेकरून ते घातक ॲप्सना स्कॅन करू शकेल.

ॲप्सवर लक्ष ठेवा: तुमच्या फोनमध्ये असे कोणतेही ॲप आहे का, जे तुम्ही स्वतः डाऊनलोड केलेले नाही? असल्यास ते तातडीने डिलीट करा.

सॉफ्टवेअर अपडेट: फोनची कंपनी जेव्हा जेव्हा सिस्टम अपडेट पाठवते, तेव्हा ते त्वरित इन्स्टॉल करा. या अपडेट्समध्ये नवीन व्हायरसपासून वाचण्यासाठी ‘सिक्युरिटी पॅचेस’ असतात. सतर्क राहा, कारण तुमची एक छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यासाठी महागात पडू शकते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ऑनलाइन फसवणूक

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मोठी बातमी! ​सात वर्षांखालील शिक्षेच्या गुन्ह्यात आधी नोटीस बंधनकारक; कोल्हापूर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

August 19, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 13, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
Next Post
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मोठी बातमी! पत्नीच्या डोक्यात कोयत्याने केले होते सपासप वार; जमिनीच्या हिश्श्यावरुन पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

धक्कादायक! सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज

August 19, 2026
हक्काच्या पैशांसाठी वृद्धांची फरफट! ३ दिवस उलटले तरी चेअरमन-संचालक गायब; दामाजी कारखान्याला ‘गेट बंद’चा थेट इशारा; मंगळवेढ्यात संतापाचा भडका

​वर्षानुवर्षांचा वनवास संपणार कधी? थकीत रकमांचा निर्णय होईना; दामाजी कारखान्याचे निवृत्त कर्मचारी आक्रमक; आज कारखान्याला ठोकणार कुलूप?

August 19, 2026
धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

धनश्री मल्टीस्टेटची ऐतिहासिक गरुडभरारी; १५ वर्षांत गाठला १,५०१ कोटींच्या ठेवींचा टप्पा; पारदर्शक कारभार अन् ग्राहकांचा विश्वास

August 19, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

वडिलांवर रुग्णालयात उपचार, डबा घेऊन जाताना मुलावर काळाचा घाला; मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर अपघात

August 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन्… मंगळवेढ्यातील महिलेची मोठी फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

August 18, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून पत्रकार नवत्रे व ग्रामसेवक पाटील निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी न्यायालयातून नाव वगळले;​ राजकीय सूडबुद्धीचा डाव उधळला

August 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा