टीम मंगळवेढा टाईम्स।
जिल्हा परिषद सोलापूर समाजकल्याण विभाग व सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या पायाभूत व मूलभूत सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी २ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
सदर योजनेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक, सार्वजनिक व भौतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या विकासात्मक बाबींच्या सक्षमीकरणासाठी सदर निधी मंजूर असल्याची माहिती आ.आवताडे यांनी दिली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या शिक्षण, आरोग्य, रस्ते पाणी या सुविधा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी या महत्त्वकांक्षी योजनेमार्फत हा भरीव निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या सदर निधीमुळे मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व धोरणात्मक विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे.
सदर योजनेअंतर्गत निधी मंजूर झालेली गावे व कामे –
हाजापूर येथील दलितवस्ती गावठाण येथे पेव्हर ब्लॉक रस्ता तसेच मोरे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे, सोड्डी येथील कलाल वस्ती पेव्हर ब्लॉक रस्ता करणे, भोरकडे – कांबळे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,
मारापुर येथील दलित वस्ती गावठाण येथे पाणीपुरवठा, रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार करणे, सातपुते वस्ती पाणीपुरवठा करणे, यादव नगर समाज मंदिर बांधणे, आंधळगाव येथील सुरवसे – कांबळे वस्ती (गोणेवाडी रोड) येथे पाणीपुरवठा करणे,
डांगे वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, महमदाबाद (शे) ऐवळे वस्ती येथे पाणीपुरवठा करणे, कचरेवाडी येथील ढावरे वस्ती येथे समाज मंदिर बांधणे, मळेवाडी येथील ढावरे – भोरकडे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे,
डोणज येथील शिंदे वस्ती येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, ऐवळे – सरवदे वस्ती पेव्हर ब्लॉक व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, डोंगरगाव येथील शिंदे वस्ती – खोमनाळ रस्ता काँक्रिटीकरण करणे,
जुनोनी येथील अवघडे वस्ती – कांबळे वस्ती रस्ता पेव्हिंग ब्लॉक करणे, शेलेवाडी येथील दलित घरकुल वस्ती येथे पेव्हर ब्लॉक रस्ता, नंदेश्वर येथील झारेवाडी येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे व कांबळे वस्ती पेव्हर ब्लॉक रस्ता करणे, साठे नगर येथे भूमिकेत गटार तयार करणे,
रड्डे येथील शिंदे वस्ती – कांबळे वस्ती रस्ता खडीकरण करणे, चांभारवाडा येथे रस्ता खडीकरण करणे, गावठाण हरिजन वस्ती येथे पाणीपुरवठा सोय करणे, लक्ष्मी दहिवडी येथील नवीन वसाहत क्रमांक – १ येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे, ससाणे वस्ती येथे रस्ता खडीकरण करणे,
गावठाण रोहिदास गल्ली येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, डिकसळ हरिजन वस्ती गावठाण पेव्हर ब्लॉक रस्ता करणे, खवे येथील हरिजन वस्ती क्रमांक १ रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, कात्राळ गावठाण स्ट्रीट लाईट सोय करणे,
रेवेवाडी येथील झेंडे वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, हातकट्टी ऐवळे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे, चोखामेळा नगर येथे पेव्हर ब्लॉक रस्ता करणे, दामाजी नगर येथे शिंदे, घोडके, वनखंडे, खडतरे, सपताळे, शेजाळ, गवळी वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे,
शिवनणगी येथील कांबळे – केंगार वस्ती येथे पाणीपुरवठा सोय करणे, शिंदे – कांबळे वस्ती येथे रस्ता खडीकरण करणे, अकोला येथील रमाई गावठाण नगर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, झेंडे – शिवशरण वस्ती क्रमांक – २ रस्ता काँक्रिटीकरण करणे, लवंगी येथील गावठाण दलित वस्ती येथे पेव्हर ब्लॉक बसविणे,
सलगर खु येथील कांबळे वस्ती येथे समाज मंदिर दुरुस्ती व पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कागष्ट गावठाण हरिजन वस्ती येथे पेव्हिंग ब्लॉक रस्ता करणे, मानेवाडी येथील गेजगे वस्ती पाणीपुरवठा सोय करणे,
लवंगी येथील रोहिदासवाडी येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, घरनिकी येथील हरिजन गावठाण वस्ती क्रमांक – २ येथे भूमिगत गटार बांधणे, ब्रह्मपुरी येथील साठे नगर येथे पेव्हर ब्लॉक रस्ता करणे, येड्राव येथील भोरकडे वस्ती येथे पेव्हर ब्लॉक रस्ता करणे
समाजातील दलित व शोषित घटकांच्या चौफेर विकासासाठी आ. समाधान आवताडे यांनी एवढा मोठा निधी उपलब्ध करून सदर घटकांच्या सर्वांगीण प्रगतीची कवाडे मोठ्या व्यापकतेने आणि विस्तृतपणे खुली केली आहेत.
मतदारसंघातील दलित घटकांच्या विकास साधनेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर झाल्याने संपूर्ण जनता आ. आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर जाम खुश झाला आहे – सौ. उज्वला लक्ष्मण मस्के, माजी पं.स सदस्या
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज