टीम मंगळवेढा टाईम्स।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत मंगळवेढ्याच्या रोहित भगरे व प्रज्ञा फटे या दोघांनी यश संपादन केले.
लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये रोहित उत्तम भगरे यांनी राज्य सेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये 588 गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादी दहावा क्रमांक मिळवला.
यापूर्वी त्याची विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्याचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका शाळा नंबर एक मध्ये तर पाचवी ते दहावी शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाले आहे.
अकरावी बारावी दामाजी महाविद्यालयात तर उच्च 12 वी नंतर वालचंद कॉलेज सांगली येथे अभियंता ही पदवी संपादन केले. व त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी पुणे येथे करून त्यांनी हे संपादन केले.
त्याचबरोबर प्रज्ञा दगडू फटे हिने 527 गुण मिळवत मुलीमध्ये 39 वा क्रमांकाने यश संपादन केले.
तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फटेवाडी येथे, तर माध्यमिक शिक्षण दामाजी हायस्कूल येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण दामाजी महाविद्यालय येथे तर पदव्युत्तर जे शिक्षण फर्गुशन कॉलेज पुणे येथे पार पडले.
तिने देखील लोकसेवा आयोगाची तयारी पुणे ते करून तिने संपादन केले. दामाजी कारखान्याच्या प्रशासन विभागातील दगडू फटे यांची ती कन्या आहे.
दुष्काळी तालुक्यामधील विद्यार्थ्यांचा ओढा अलीकडे स्पर्धा परीक्षाकडे वाढला आहे. त्यामध्ये अनेक जण यामध्ये यशस्वी झाले आहे. यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोघांच्या यशाबद्दल आ.समाधान आवताडे, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा, भैरवनाथ शुगर्सचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील,
उपाध्यक्ष तानाजी खरात, आवताडे डिस्टलरीचे अध्यक्ष संजय अवताडे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रदीप खांडेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे, अजित जगताप, प्रतिक किल्लेदार, सोमनाथ माळी, सरपंच विनायक यादव यांनी अभिनंदन केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज