टीम मंगळवेढा टाईम्स (प्रतिनिधी):
मंगळवेढा येथील पंढरपूर बायपासजवळील राजनंदन कॉलनी (दामाजीनगर) भागात एका बंद पत्राशेडचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि घड्याळे असा एकूण ६७,००० रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी हनुमंत नारायण कांबळे (वय २८, रा. राजनंदन कॉलनी, दामाजीनगर, मंगळवेढा) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमकी घटना काय?
फिर्यादी हनुमंत कांबळे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने ते कुटुंबासह शेजारीच असलेल्या पत्राशेडमध्ये राहतात. दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास कांबळे कुटुंब नातेवाईकाच्या (भाचीच्या) वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी उमदी (ता. जत) येथे गेले होते.

दुसऱ्या दिवशी, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता कुटुंब घरी परतले असता, पत्राशेडचा दरवाजा उचकटलेला दिसला. घरात आत जाऊन पाहिले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि बेडच्या ड्रावरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले.

चोरीला गेलेला मुद्देमाल (एकूण ₹६७,०००/-):
सोन्याचे दागिने: २ सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी ५ ग्रॅम, एकूण १० ग्रॅम) – ₹५०,०००/-
चांदीची मूर्ती: १५ भार वजनाची चांदीची गणपती मूर्ती – ₹५,०००/-
डिजिटल घड्याळे: ३ डिजिटल घड्याळे – ₹६,०००/-
रोख रक्कम: भारतीय चलनातील ₹७,०००/-

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दि. १२ ऑगस्ट रात्री ७:०० ते दि. १३ ऑगस्ट सकाळी १०:३० या कालावधीत घर बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने पत्राशेडमध्ये प्रवेश करून सदर ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज








