टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधण्याची मागणी या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार भीमा नदीवर को.प. पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी ३४ कोटी ९९ लाख ४३ हजार ४०६ रुपये मंजूर झाले असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.
नदीकाठ शेतकऱ्यांना फायदा
या बंधाऱ्यामुळे तामदर्डी, बोराळे, सिद्धापूर, मुंढेवाडी, माचनूर, ब्रह्मपुरी, रहाटेवाडी, बठाण, उचेठाण तर मोहोळ तालुक्यातील अरबळी, मिरी, बेगमपूर, अर्धनारी, वडदेगाव, येणकी या गावातील क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.
शेतकरी बांधवांनी आपला कार्यक्रम समजून उपस्थित राहावे
आज दुपारी १ वाजता माचणूर येथील श्री संत बाबामहाराज आर्वीकर यांच्या मठामध्ये जाहीर सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन तरी आज होणाऱ्या सत्कार समारंभ व शेतकरी मेळाव्यास परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आपला कार्यक्रम आहे समजून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे हे आव्हान सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले.
दुष्काळाच्या झळा यापुढे बसणार नाहीत
आमदार समाधान आवताडे यांनी अनेक वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न आचारसंहितेच्या आधी सोडवल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना व त्यांच्या पुढील पिढ्यांना दुष्काळाच्या झळा यापुढे बसणार नाहीत.
आमदार आवताडे यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करून तामदर्डी या ठिकाणी भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी शासनाकडून रुपये ३५ कोटी मंजूर करून आणले. आणि लगेचच कामाला सुरुवातही झाली.
आमदार आवताडे यांच्या या तत्त्परतेबद्दल या भागातील शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता माचणूर येथील श्री संत बाबामहाराज आर्वीकर यांच्या मठामध्ये जाहीर सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या मेळाव्यास या भागातील सर्व शेतकरी बांधवांनी आपला कार्यक्रम समजून वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर बंधारा उभारणीसाठी येथील शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने केली, सदर बंधाऱ्याच्या ठिकाणी शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात पिके वाचवण्यासाठी मातीचा बांध घालून पाणी आडवत होते.
येथील संबंधित शेतकऱ्यांनी आ.आवताडे यांच्याकडे या बंधाऱ्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर आमदार आवताडे यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी करून या बंधाऱ्याला तात्काळ मंजुरी द्या अशी मागणी केली होती.
त्यानुसार सरकारने संबंधित बंधाऱ्याला निधी देऊन येतील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत बंधारा मंजूर केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज