बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून शनिवारी सांगोला शहर २ , कोळा १ , अचकदाणी ४ , नाझरा १ असे आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. The number of corona positive patients in Sangola is 547
सांगोला तालुक्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५४७ झाली आहे. सांगोला तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. शनिवारी ७५ जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आली . त्यात सांगोला शहर २ , कोळा १ , अचकदाणी ४ , नाझरा १ अशा आठ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे . सोलापूर येथे पाठवलेल्या स्वबचे अहवाल प्राप्त झाले नाहीत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील ५० जणांचे स्वब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत एकूण ५४७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे . शनिवारी तीन जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ३२६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनाने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २१२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार योगेश खरमाटे यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज