टीम मंगळवेढा टाईम्स । पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद तालुका दौंड हद्दीत रात्री ८ वाजता टेम्पोचालक खाली उतरला असता दोन काळ्या रंगाच्या पल्सरवरती आलेल्या अज्ञात चोरट्यांनी ३० लाख रुपये असलेली बॅग चोरून नेली , सदर रक्कम ही पोल्ट्री फार्म ची असल्याची माहिती मिळत आहे. Thieves looted Rs 30 lakh on Pune-Solapur National Highway
हा टेम्पो पुण्यकडून सोलापूर कडे चालला होता , या संदर्भात दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सुरक्षायंत्रणेद्वारे त्वरित मेसेज देऊन मळद हद्दीतील वृंदावन हॉटेल जवळ घडलेल्या घटनेची माहिती परिसरातील पोलीस पाटील व नागरिकांना दिली.
तरी याबाबत काही माहिती मिळाल्यास दौंड पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे . ग्रा।सुरक्षा यंत्रणेद्वारे माहिती देऊन दौंड पोलिसांनी त्वरित तपास करण्यास सुरुवात केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज