टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोमवार दि.17 मे रोजी केंद्र सरकार चे इंधन दरवाढ गॅस दरवाढ व खते दरवाढ विरोधात प्रांत कार्यालय मंगळवेढा येथे मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे चे वतीने आंदोलन करण्यात आले.
याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजम्मील काझी व पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मंगळवेढा शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपविभागीय कार्यालय दिशेने मोटारसायकल ढकलत नेत इंधन व खत दरवाढीचे निषेधार्थ इंधन दरवाढ थांबलीच पाहीजे,
केंद्र सरकारचा निषेध असो, या सरकार च करायच काय खाली मुढी वर पाय, कोण म्हणतय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत निषेध नोंदवून निवेदन देण्यात आले.
यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस लतीफभाई तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करत केंद्र सरकारवर हल्ल्या चढविला.
तांबोळी यांनी बोलताना सांगीतले की सध्या संपूर्ण भारतात देश कोरोना सारख्या महामारीने झुजंत आहे, लोकावर उपासमारीची वेळ आली आहे, मजूराचे हाताला काम नाही, शेती मालाला भाव नाही अशात केंद्र सरकारने केलेली दरवाढ ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे.
केंद्रात असणारे सरकार हे गेडयाची कातडी पांघरूण घेऊन बसले आहे त्याला सामान्य जनतेचे काही देणे घेण नाही अशा मुद्द्यावर निषेध व्यक्त केला.
केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू असा ईशारा निवेदनाव्दारे मुजम्मील काझी यांनी दिला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माजी जि प सदस्य व्यंकट(आण्णा)भालके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य राहुल शहा, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे ओ बि सी सेल चे सरचिटणीस लतीफ भाई तांबोळी, राज्य सहसचिव राष्ट्रवादी काँग्रेस (एससी सेल)विजय कुमार खवतोडे,तालुका राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष भारत बेदरे,मंगळवेढा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुझमील काझी,
राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल जिल्हाध्यक्ष विलास चेळेकर सौ.अरुणाताई माळी नगराध्यक्ष, पक्ष नेते अजित जगताप,अरुण किल्लेदार,जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष संजय पाटील,संदीप बुरकुल शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस,उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,ज्ञानेश्वर भगरे,चंद्रशेखर कोंडुभैरी,सोमनाथ माळी,सुरेश कट्टे पाटील,राहुल टाकणे,
चंद्रकांत काकडे,गणेश धोत्रे,प्रज्वल शिंदे,बंडू बेदरे,सागर कसरे,माऊली गोवे राजेंद्र अमंगे,बंडू बेदरे,भैय्या चव्हाण,विशाल आयवळे प्रथमेश राठोड,धीरज काळे, अण्णा उपाडे,विक्रम शिंदे,गणेश राजगुरू उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज