माढा : बाळासाहेब झिंजुरटे (मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क)
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. त्यांच्यासोबत मतदारसंघातील नेत्यांबरोबरच सामान्य जनतेची ताकद त्यांच्याकडे आहे.
मोहिते-पाटील गटाची ताकद उपयोगी
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा आहे. त्यांच्या काळात त्यांनी अनेक कार्यकर्ते, नेत्यांना उभे केले. मोहिते-पाटील गटाचे जाळे त्यांनी जिल्ह्यात उभे केले आहे.
त्याचाही फायदा धैर्यशील मोहिते-पाटील यांना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा करून घेण्यावर सध्यातरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा भर दिसून येत आहे.
माजी आमदार त्यांच्यासोबत
माढा मतदारसंघातील विद्यमान आमदार जरी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असले तरी करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मोहिते-पाटील यांना साथ देण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांचे दोन्ही नातूही मोहिते- पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्याचाही फायदा सांगोल्यातून होणार आहे.
याशिवाय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाडही मोहिते-पाटलांच्या प्रचारात दिसत आहेत. त्यामुळे माजी नेतेमंडळींचा प्रचारात फायदा होत आहे.
जानकरांची उत्तम साथ
मागील ४० वर्षांपासून एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले विजयसिंह मोहिते-पाटील व उत्तम जानकर या निवडणुकीत पूर्वीचे वैर विसरून एकत्र आले आहेत. त्याचाही फायदा धैर्यशील मोहिते- पाटील यांना या लोकसभेच्या निवडणुकीत होणार आहे.
मागील लोकसभेप्रमाणे या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून मोहिते- पाटील यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे.
अँटीइनकंबन्सीचा लाभ होण्याची शक्यता
मागील दहा वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे लोकांमध्ये काही प्रमाणात अँटीइनकंबन्सीचा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर तसे झाले तर त्याचा लाभ धैर्यशील मोहिते-पाटील यांना या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अँटीइनकंबन्सी ते कशा पद्धतीने कॅश करतील, यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.
एकंदरीत पाहता ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून सध्या स्थितीला तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज