टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार समाधान आवताडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात सदिच्छा भेट घेतली. समाधान तू नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस , मलाही समाधान आहे , असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार समाधान आवताडे यांना चांगले काम करा असे सांगून शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीविषयी आमदार समाधान आवताडे यांना विचारले असता ते बोलताना म्हणाले की, विधानसभेची पोटनिवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रथमच पंढरपुरात आले होते. त्यामुळे आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला सोमवारी रात्री जाणार पाहून होतो.
तथापि , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियोजित वेळेपेक्षा आधी आल्यामुळे सोमवारी रात्री त्यांचे स्वागत करता आले नाही. सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईकडे निघालेले असताना निरोप आला. त्यामुळे आपण तातडीने विश्रामगृहात पोचलो.
शासकीय विश्रामगृहाच्या आवारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले. आपल्याकडे पाहून मुख्यमंत्री श्री . ठाकरे यांनी समाधान तू नावाप्रमाणेच समाधानी दिसत आहेस , मलाही समाधान आहे , असे म्हणत पाठीवर थाप टाकून त्यांनी चांगले काम करण्याविषयी आपल्याला शुभेच्छा दिल्या , असे आमदार आवताडे यांनी बोलताना सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज