टीम मंगळवेढा टाईम्स ।
नेते बदलले, विरोधक बदलले, आम्ही आहे तिथेच आहे. विरोधक कुठे आहेत, याची तपासणी करा, असा सल्ला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोधकांना दिला आहे.
सध्या नगर परिषदेच्या निवडणुका होणार असल्याने पंढरपुरात राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.
आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे व भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत हे एकत्र येऊन नगर परिषद निवडणूक लढवण्यासाठी मूठ बांधत असल्याचे दिसून येत आहे.
पंढरपूर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार राजू खरे यांनी पंढरपुरातील मालकशाही संपवणार, अशी परिचारकांवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना माजी आ.प्रशांत परिचारक बोलत होते.
ते पुढे म्हणाले, परिचारक कुटुंबाला मागील ४० वर्ष या सगळ्यांबरोबर लढण्याची सवय झाली आहे. नेते बदलले, विरोधक बदलले, आम्ही आहे तिथेच आहे, ते कुठे आहेत, याची तपासणी करा. कारण द्वेषाचे राजकारण फार काळ टिकत नाही.
कोणाचा तरी द्वेष करायचा, कोणाला तरी संपवायचं म्हणून तुम्ही राजकारण कराल हे फक्त काही दिवसच चालत असतं, असे परिचारक म्हणाले.
समर्थक आक्रमक
परिचारकांवर टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ, अशी भूमिका परिचारक गटाच्या गुरुदास अभ्यंकर व विक्रम शिरसट या नेत्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. यामुळे परिचारकांचे समर्थकही आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज