मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सुवर्णरत्न मल्टिस्टेट बँकेत विविध पदांसाठी 16 जागांची भरती निघाली आहे.
यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात देखील झाली आहे. 30 तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली असून , अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या 5 फेब्रुवारी 2025 आहे. तसेच 7 फेब्रुवारी 2025 रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुम्ही सुवर्णरत्न मल्टिस्टेट बँकेत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता.
संस्थेच्या शाखा;-
सुवर्णरत्न मल्टिस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी बँकेची मुख्य शाखा सिद्धापूर येथे असून बोराळे, नंदूर, मंगळवेढा, अनवली, बेगमपूर, कुरुल, सोलापूर येथील शाखेसाठी विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
मुलाखत ठिकाण
इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर शुक्रवारी दि.7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बायोडाटासह हजर राहावे
पत्ता : श्री मल्लिकार्जुन अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, मंगळवेढा, धर्मगाव रोड, पंढरपूर-सोलापूर बायपास जवळ, दामाजीनगर मंगळवेढा
शाखा व्यवस्थापक ( सोलापूर शाखेसाठी)
पद संख्या 1
उत्तम संवाद कौशल्ये आणि संगणक ज्ञान आवश्यक
शैक्षणिक पात्रता : (बी. कॉम/ एम.कॉम/बीबीए/एमबीए शैक्षणिक पात्रता असावी)
अनुभव : बँकिंग क्षेत्रात किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
लोन ऑफिसर ( वरील सर्व शाखेकरिता)
पद संख्या 15
उत्तम संवाद कौशल्ये आणि संगणक ज्ञान आवश्यक, किमान पदवीधर शैक्षणिक पात्रता असावी.
फ्रेशर देखील अर्ज करू शकतात, बँकिंग क्षेत्रात किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल.
पगार आणि सुविधा
निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देण्यात येणार आहे तर इन्सेटीव्ह आणि प्रमोशनची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच उत्कृष्ट कार्य संस्कृती आदी सुविधा मिळणार आहेत.
येथे करा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी suvarnratnamscs@gmail.com या मेल वरती बायोडाटा पाठवावा.
मुलाखत ठिकाण
पत्ता : श्री मल्लिकार्जुन अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, मंगळवेढा, धर्मगाव रोड, पंढरपूर-सोलापूर बायपास जवळ, दामाजीनगर मंगळवेढा
7 फेब्रुवारी रोजी मुलाखती
अर्ज करण्यासाठी 5 फेब्रुवारी ही शेवटची संधी असून 7 फेब्रुवारी रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधावा
सुवर्णरत्न मल्टीस्टेट बँकेत नोकरी संदर्भात अधिक माहितीसाठी 7768947903 / 9975312379 किंवा 9011926698 या नंबर वरती संपर्क साधू शकता.
जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि भरगच्च पगाराची नोकरी हवी असेल तर ही सुवर्णसंधी गमावू नका त्वरित अर्ज करा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज