मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) च्या पोलिसाचे घर फोडून अज्ञात चोरट्याने आतील सोन्या चांदीचे दागिने व अन्य साहित्य मिळून २ लाख ९३ हजाराच्या ऐवजाची चोरी केली.
ही चोरी १८ रोजी सायंकाळी ५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान झाली.
महेश बंकटेश थोरात (वय ४० रा. रा. सरस्वती बिल्डींग एसआरपी कॅम्प) यांनी विजापूर रोडवरील एजी पाटील कॉलेच्या पाठीमागे घर घेतले आहे. नवीन घर घेतल्याने ते कॅम्पमधून घर सामान शिफ्ट करीत होते. १८ ऑगस्ट रोजी त्यांनी आर्धे सामान शिफ्ट केले होते.
आर्ध सामान एसआरपी कॅम्प येथेच असल्याने नविन घराला कुलूप लावून ते झोपण्यासाठी जुन्या घरी गेले होते. सकाळी पुन्हा नवीन घरी आले तेव्हां त्यांना घराच्या गेटचेव दरवाज्याचे कुलूप तुटलेल्या आवस्थेत दिसून आले.
आतमध्ये पाहिले असता चोरट्याने कपाटातील दोन लाख ९३ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदिचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी विजापूर नाका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास फौजदार गायकवाड करीत आहेत
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262.
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज