mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील तीन घरफोड्या उघडकीस; साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 21, 2023
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

मंगळवेढा तालुक्यातील 3 घरफोडी चोरी गुन्हयांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून चाचा प्रभु काळे (वय 26 रा.उंब्रज ता.चडचण जि.विजयापुरा कर्नाटक) याला अटक केली आहे.

त्याच्याकडून 5 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने,  1 मोटार सायकल व 6 मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 3 लाख 55 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.9 जून 2023 रोजी रात्री 11 च्या सुमारास ते दि.10 जून 2023 रोजी सकाळी 05ः00 वा चे सुमारास मौजे बठाण ता.मंगळवेढा येथे फिर्यादी व तिचे घरातील इतर लोक घरात झोपले असताना,

अज्ञात चोरटयांनी दरवाजाचे कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील कपाटातून लग्नाकरीता आणलेले सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 10 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेले म्हणून विष्वास माणीक बेदरे (रा. बठाण मंगळवेढा) यांनी अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद दिल्याने मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं 482/2023  भादवि कलम 457, 380  प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सहा.पोलीस निरीक्षक, शशिकांत शेळके व त्यांचे पथक मंगळवेढा शहरात हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं 482/2023 भादविक 457, 380 प्रमाणे दाखल असलेला गुन्हा हा रेकाॅर्डवरील पाहिजे असलेल्या आरोपीने केला असून तो बोरोळे नाका मंगळवेढा येथे एका सिल्व्हर रंगाच्या मोटार सायकलसह थांबला आहे.

त्यावरून तात्काळ त्याठिकाणी जावून मिळालेल्या बातमीप्रमाणे त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे मिळून आलेल्या मोटार सायकलच्या कागदपत्राची मागणी केली असता त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगितले.

तेंव्हा त्याचे मोटार सायकलला अडकविलेली पांढ-या रंगाची प्लास्टिक पिशवी तपासून पाहिली असता, त्यामध्ये विविध कंपनीचे एकूण 06 जूने मोबाईल हॅन्डसेट मिळून आले.

त्याबाबत त्याचेकडे विचारपूस करता त्याने सांगितले की, मागील दिड ते दोन वर्षामध्ये ऊस तोडी कामगारांच्या झोपडीमध्ये चार्जिंग करीता लावलेले मोबाईल रात्रीच्या वेळी चोरी केले असल्याचे सांगितले.

तसेच त्याचेकडे मौजे बठाण ता. मंगळवेढा येथील घरफोडी चोरीच्या गुन्हयांचे अनुशंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने सांगितले की, मागील सुमारे 02 महिन्यापूर्वी मौजे बठाण येथे त्याचे इतर 02 साथिदारासह घरफोडी चोरी केल्याचे सांगितले.

त्यास आणखीन विश्वासात घेवून कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने मागील 7 ते 8 महिन्यामध्ये मंगळवेढा येथील मौजे डोणज व सलगर या ठिकाणी ही घरफोडी चोरी केल्याचे सांगितले. त्याचेकडून एकूण 05 तोळे 02 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 01 मोटार सायकल व 06 मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 3 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपीताकडून उघडकीस आलेल्या गुन्हयांची माहिती खालील प्रमाणे,
1मंगळवेढा482/2032 भादविसंक 457, 380
2मंगळवेढा39/2023 भादविसंक 457, 380
3मंगळवेढा211/2023 भादविसंक 457, 380

पाहिजे असलेले गुन्हे
1मंगळवेढा404/2019 भादविक 379
2मंगळवेढा370/2023 भादविक 379
3मंगळवेढा418/2023 भादविक 457, 380
4कामती69/2016 भादविक 380

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, सफौ/ ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, पोहेकाॅ/ धनाजी गाडे, प्रकाष कारटकर, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख यांनी बजावली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूरस्थानिक गुन्हे शाखा

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 30, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
Next Post

अभिजीत पाटील यांनी मंगळवेढ्यात गावभेट दौरे वाढवले; माचनूर येथील सिद्धेश्वराचे घेतले दर्शन

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..