mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 11, 2026
in मनोरंजन, राज्य
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

आजपर्यंत देशाच्या इतिहासात महाराष्ट्राची ओळख कायमच पुरोगामी राज्य म्हणून राहिली आहे. सांगलीतील एका आगळ्यावेगळ्या विवाहाने महाराष्ट्रातील ही ओळख अजूनही शाबूत असल्याचे नव्याने दाखवून दिले आहे.

सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या जोडप्याचा एक आदर्शवत लग्नसोहळा नुकताच पार पडला.

सूरज आणि मधूमिता या जोडप्याचा सत्यशोधक पद्धतीने आणि विवाहातील अनावश्यक खर्च टाळत लग्नासाठी वापरली जाणाऱ्या रक्कम सामाजिक संस्थांना मदत या भावनेतून साध्या पण अनेक सामाजिक संदेश देणारा लग्न सोहळा पार पडला.

सुरज हा शिक्षण पर्यावरण आणि लैंगिक शिक्षण या सामाजिक प्रश्नावर काम करतो तर मधुमिता ही वृद्धाश्रम आणि बांधकाम कामगारांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर काम करते. या दोघांनी आपल्या विवाहातील अनावश्यक खर्च टाळत काही रक्कम सामाजिक संस्थांना दान केली.

ईश्वरपूरचा सुरज उर्मिला सुनील तर नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मधुमिता शोभा-अर्जुन यांनी आडनाव न लावता सर्वजण समान या भावनेतून सामाजिक काम करणाऱ्या या दोघांनी आपल्या विवेकनिष्ट सहजीवनच्या नात्यास सुरुवात केली.

लग्नात विवेक, समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रेम, सत्य, अहिंसा, पर्यावरण या सप्तपदीच्या पावलावर चालत त्यांनी आपल्या जीवनातील नव्या टप्प्याचा प्रारंभ केला.

सुरज आणि मधुमिता यांची ओळख सामाजिक काम करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून झाली होती. या दोघांची मैत्री झाल्यानंतर पुढे त्यांचे आयुष्याविषयीचे विचार जुळू लागले. त्यामुळे या दोघांनी सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सुरज आणि मधुमिता या दोघांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही चांगली आहे. मात्र, तरीदेखील दोघांच्या कुटुंबीयांनी या लग्नाला आणि सत्यशोधक पद्धतीने लग्न करण्यास मंजुरी दिली.

तसेच सामाजिक संस्थांना मदत हाच आमचा आहेर, असे म्हणत विवाहातील अनावश्यक खर्च टाळत जवळपास 2 लाख रुपये सामाजिक संस्थांना मदत म्हणून दिली.

लग्नात यामुळे पुस्तक प्रदर्शन, विविध संस्थाच्या कामाची माहिती देणारे प्रधान आणि सत्यशोधक पद्धतीच्या विवाहाला पुरस्कृत करणारे विचार दिसून आले. सध्याच्या लाखो रुपये खर्चून भपकेबाज पद्धतीने लग्न करण्याच्या युगात सुरज आणि मधुमिता यांचा सत्यशोधक विवाह एक आदर्श घालून देणारा ठरला आहे.

मधुमिता ही वृद्धाश्रम आणि बांधकाम कामगारांच्या मुलांच्या आरोग्य व शिक्षणावर काम करते. तर सूरज शिक्षण, पर्यावरण आणि लैंगिक शिक्षण या विषयांवरील सामाजिक प्रश्नांवर काम करतो. नवीन गोष्टी शिकत समाज परिवर्तनासाठी आवश्यक जितकं जमतंय तितकं करण्याचा त्याचा प्रयत्न सुरु असतो. त्यामुळे लग्नाचं नियोजन करताना दोघांनी ठरवलं की अवाजवी खर्च टाळून तेच पैसे सामाजिक संस्थांना देऊ.

लग्न एकदाच होतं हे आम्हालाही पटतंय, म्हणूनच एका दिवसात ते पैसे अक्षरशः उडवण्यापेक्षा ते विधायक पद्धतीने खर्च करुन लग्नं खऱ्या अर्थाने साजरा करु, स्मरणीय बनवू, ही संकल्पना आमच्या पालकांनीही उचलून धरली आणि ते मिळून 2 लाख रुपये संस्थांना देणगी दिली, असे या दोघांनी सांगितले..

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सांगली बातमी

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 23, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 20, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​मिनी मंत्रालयातील भाजपचा सेनापती ठरणार, गटनेतेपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब; सोलापूरच्या राजकारणात भाजपचा मोठा गेमप्लॅन

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा