टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या वातावरणात कमालीचे बदल बघायला मिळत आहे. अवकाळी पावसाची हजेरी, कडक ऊन यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
उन्हाचा कडाका वाढला की अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण होते. अवकाळी पावसानंतर उन्हाचा कडाका वाढतो. रणरणत्या उन्हात अंगाची काहिली होत आहे.
या काळात उष्माघाताचा त्रास सुरू होतो. या कडक उन्हापासून वाचण्यासाठी वेळीच योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी केले आहे.
वातावरणातील तापमान खूप वाढल्यावर शरीरातील पाणी कमी होऊन उष्माघात होतो. त्यावेळी त्या व्यक्तीला ताप येणे, डोळ्यांची आग होणे, खूप तहान लागते, डोळ्यासमोर अंधारी येणे, अतिघाम येणे,
मळमळ, उलट्या, घबराट आणि जास्त प्रमाणात थकवा, त्वचा निळी पडणे, शरीराचे तपमान अचानक कमी होणे, रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे अशी लक्षणे दिसत असल्याचेही डॉ. बागडे यांनी सांगितले.
उष्माघातपासून बचाव करण्यासाठी या दिवसांमध्ये पांढरे कपडे घालावेत. शक्यतो या दिवसांमध्ये काळे कपडे घालणे टाळावे. उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालणे, स्कार्फ गुंडाळणे काही नसल्यास रुमाल तरी डोक्यावर ठेवावा. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी या दिवसांमध्ये वारंवार पाणी पिणे, लिंबू सरबत, लस्सी, वाळा सरबत प्यावे.
उन्हातून आल्यावर लगेच फ्रिजचे थंड पाणी शक्यतो टाळावे. उन्हाळ्यात दुचाकीवरून प्रवास करताना किंवा फिल्डवर काम करताना डोक्यात हेल्मेट, टोपी आणि रुमाल बांधावा.
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सनग्लासेसचा वापर करावा. उन्हाळ्याच्या दिवसात कुठेही बाहेर पडताना पाण्याची बाटली हमखास ठेवावी असे आवाहनही , काही नसल्यास रुमाल तरी डॉ.बागडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज