टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील प्रहार संघटनेचे पंचायत समिती मंगळवेढा येथे उपोषण सुरू आहे.
मंगळवेढा तालुक्यातील सर्व दिव्यांगांचा निधी खर्च करणे, महात्मा गांधी नरेगा मधून मंजूर झालेले विहिरीचे काम त्वरित चालू करा,
ज्या विहिरीचे काम पूर्ण झाले त्यांना तात्काळ मास्टर प्रमाणे बिले द्या मंजूर झालेल्या घरकुलांची मास्टर प्रमाणे बिले द्या, पंचायत समिती समाज कल्याण विभागातील दिव्यांगाचा सेसफंड प्रत्येक गावात खर्च करा जे ग्रामसेवक मस्टरवर सही करत नाही.
त्यांच्यावर गट विकास अधिकारी यांनी सही करून शेतकऱ्यांना घरकुल व विहीर लाभार्थ्यांना बिले द्या अशा विविध मागण्या घेऊन प्रहार संघटनेचे उपोषण सुरू झाले आहे.
आज उपोषणाच्या पहिल्या दिवशी माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे व माजी पंचायत समितीचे सभापती प्रदीप खांडेकर यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु तोडगा निघू शकला नाही कारण उपोषण कर्ते यांनी गटविकास अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताच त्यांची बोलती बंद झाली यावेळी शेतकऱ्यांना पाहिजे असे उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी उत्तर न घेता उपोषण सुरूच ठेवले.
जोपर्यंत नरेगांमधून विहिरींची कामे सुरू होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार अशी भूमिका प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी यांनी घेतली आहे.
या उपोषण वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, प्रहार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, सर्जेराव पारध्ये, संजय वाघमोडे, पिंटू कोळेकर,
महिला तालुकाध्यक्ष रुक्मिणी कोकरे, शहराध्यक्ष सविता सुरवसे, जयश्री कोळी, रावसाहेब बिले, संभाजी गोसावी, शिवानंद नरळे, शहराध्यक्ष आनंद गुंगे, तालुका संपर्कप्रमुख शकील खाटीक अनेक मोठ्या प्रमाणात प्रहार सैनिक उपस्थित होते.
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने उत्तर मिळत नाही तोपर्यंत हे प्रहारचे आंदोलन सुरूच ठेवणार अशी ठाम भूमिका आंदोलन करत्यांची आहे. असे प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज