mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 25, 2026
in राज्य
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

मंगळवेढा टाईम्स  न्युज नेटवर्किंग ।

खरीप हंगाम तोंडावर आला असताना राज्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामे रखडली असून पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेत जालना प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यावरील बंदी अवघ्या दोन दिवसांत मागे घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

जालना प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यावरील बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर कृषी यंत्रांसाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध होणार आहे.

खरीप हंगामाची लगबग सुरू पेरणीपूर्व मशागत आणि इतर शेतीकामांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अशावेळी प्रशासनाने अचानक कॅनमध्ये इंधन भरण्यास बंदी घातल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले होते.

डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर न्यावे लागत होते. अनेक गावांमधून पेट्रोल पंप दूर असल्याने वेळ, अतिरिक्त इंधन आणि मजुरीचा खर्च वाढलाय. त्यामुळे शेतीकामांवर थेट परिणाम होतोय.

पंपावर लागल्या होत्या वाहनांच्या रांगा

कॅन बंदी लागू झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर आणि वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

ज्यांच्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर नव्हते किंवा शेतापर्यंत डिझेल नेण्याची सुविधा नव्हती, अशा शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली होती. या परिस्थितीमुळे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

शासनाने अवघ्या दोन दिवसांत निर्णय बदलला

डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढू लागला. शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत आपला निर्णय मागे घेतला. त्यामुळे आता पुन्हा कॅनमध्ये डिझेल देण्यास परवानगी देण्यात आली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डिझेल खरेदीसाठी अटी

इंधनाचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर अटी लागू केल्या आहेत.

डिझेल घेण्यासाठी कागदपत्रे लागणार आहेत

अॅग्रीस्टॅक आयडी सादर करावा लागेल.

अॅग्रीस्टॅक नसल्यास स्वतंत्र नोंद वहीत माहिती नोंदवली जाणार

आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी देणे अनिवार्य असणार आहे.

पेट्रोल पंप चालकांनी या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत.

गैरवापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

कॅनमध्ये मिळणाऱ्या इंधनाचा गैरवापर किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास संबंधित पेट्रोल पंप चालकांवर अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 02482-225311 किंवा 8888125312 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डिझेल विक्री

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
Next Post
मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या ‘या’ नावांची जोरदार चर्चा

मंगळवेढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक; पक्षबांधणीवर भर, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदांच्या 'या' नावांची जोरदार चर्चा

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा