mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सूर्योदयचे फाउंडेशनचे कार्य तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी; माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील; संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 13, 2023
in सोलापूर

Mangalwada Times news network

संपूर्ण सोलापूर जिल्हा तसेच महाराष्ट्र व कर्नाटकचे कार्यक्षेत्र नजरेसमोर ठेवून कार्यरत असलेला सूर्योदय उद्योग समूह आणि एल के पी मल्टीस्टेट परिवार आहे.

या उद्योग समूहांने अनेक उद्योग आणि व्यवसायांबरोबरच सामाजिक बांधिलकी देखील जपण्यासाठी उभा केलेल्या सूर्योदय फाउंडेशनचे कार्य तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केले.

या उद्योग समूहाचे आणि सूर्योदय फाउंडेशन चे संस्थापक अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.

सूर्योदयाच्या माध्यमातून कार्यरत असलेले अनिलभाऊ इंगवले, जगन्नाथ भगत गुरुजी, डॉ. बंडोपंत लवटे व सुभाष दिघे गुरुजी या मंडळींना गेल्या 25 ते 30 वर्षापासून मी पाहत आलो आहे. कुठल्याही प्रकारची औद्योगिक पार्श्वभूमी नसताना जिद्द ,चिकाटी आणि कष्ट व धडपड या जोरावरच या मंडळींनी

आज महाराष्ट्राच्या नजरेत भरेल अशा पद्धतीचे काम उभा केलेले दिसत आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देखील एल के पी मल्टीस्टेटच्या माध्यमातून शाखा उभारण्याची मोहीम आखली जात आहे.

वृक्षारोपण , रक्तदान शिबिर त्याचबरोबर सेवाभावी संस्थांना मदत अशा लोकोपयोगी उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करत सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी जपण्याचं काम या सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून उभे राहत असल्याचाही भावना यावेळी बोलताना दीपकआबांनी व्यक्त केल्या.

सकाळी मेडशिंगी येथील सूर्योदय दूध प्लांट नजीकच्या रस्त्याकडे ला काही वृक्षांचे रोपण करण्यात आले. माझ्या परिघात सेवा समूह या सेवाभावी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच सांगोला येथे सूर्योदय अर्बनच्या इमारतीमध्ये सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्यामुळे तब्बल 231 रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

सांगोला येथील रेवेनिल ब्लड बँकेच्या टीमने या शिबिराची उत्तम कामगिरी पार पाडली. या वाढदिवस समारंभासाठी सांगोल्याचे लोकप्रिय आमदार एड. शहाजीबापू पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, फॅबटेकचे प्रमुख भाऊसाहेब रुपनर,

भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, युवक नेते गुंडादादा खटकाळे, संभाजी ब्रिगेडचे अरुणभाऊ केदार, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजि.रमेश जाधव, सुवर्णरत्न मल्टीस्टेटचे महादेव बिराजदार, समर्थ हॉस्पिटलचे डॉ. विजयकुमार इंगवले, शोभाश्री परिवाराचे किरण पुजारी,

मेडशिंगी चे सरपंच प्रतापसिंह इंगवले, वाढेगाव चे सरपंच नंदकुमार दिघे, दहिवडीचे सरपंच प्रकाश जूंधळे, माजी सरपंच विजयसिंह इंगवले, उद्योजक बबनभाऊ इंगवले , उद्योजक किरणभाऊ पांढरे महादेव दिघे सर, संजय साळुंखे ,अक्षय पवार, अवधूत वाघमोडे यांच्यासह असंख्य मान्यवरांनी दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव केला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्योदय उद्योगसमूहातील सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल इंगोले

संबंधित बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सातबारा, दाखले अन् मोजणी अर्ज आता थेट हातात; सोलापूर जिल्ह्यातील ११ मतदारसंघांत भव्य शिबिर; तुमच्या मतदारसंघात शिबिर कधी आणि कुठे?

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
Next Post

सभासदांनो! जुलमी चेअरमनच्या कचाट्यातून मुक्त व्हा: अभिजीत पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन; ७० टक्के मतदान देण्याचा गावकऱ्यांचा निर्धार

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 25, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..