mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मुलांनो लागा तयारीला! दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 22, 2021
in शैक्षणिक
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांची प्रतीक्षा आता संपली आहे. बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 दरम्यान, तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 दरम्यान घेतली जाणार आहे.

यंदा एचएससी (इ. १२ वी) बोर्डाची परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल,राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येतात.

मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2020च्या परीक्षेचा निकाल दरवर्षीपेक्षा (जुलैमध्ये) उशिरा लागला. त्यानंतर दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आली. मात्र, त्यानंतर राज्यातील जवळपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष दहावी-बारावीच्या 2021मध्ये होणाऱ्या परीक्षांकडे लक्ष लागले होते.

या परीक्षा कधी होणार?, हे शालेय शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येत नव्हते. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक संभ्रमात होते. याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी बोर्डाच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येतील, असे जाहीर केले होते.

दरम्यान, गायकवाड यांनी गुरुवारी ट्विटरद्वारे दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा कळविल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिलला सुरू होतील आणि 29 मेपर्यंत संपतील.

बारावीची निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तसेच दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिलला तर प्रात्यक्षिक परीक्षा 28 मेपासून सुरू होईल आणि 31 मे पर्यंत संपेल.

या परीक्षेचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे गायकवाड यांनी सांगितले आहे. कोरोनाबाबत केंद्र व राज्य सरकार तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून या परीक्षांचे आयोजन करण्यात मान्यता देण्यात आल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

बारावीच्या परीक्षेचा तपशील :

– परीक्षा : परीक्षेचा कालावधी : संभाव्य कालावधी दिवस :
– लेखी परीक्षा : 23 एप्रिल ते 29 मे 2021 : 37 दिवस
– माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान ऑनलाइन परीक्षा : 27 मे ते 5 जून : 10 दिवस
– प्रात्यक्षिक/श्रेणी सुधार /तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा : 27 मे ते 2 जून : 7 दिवस

दहावीच्या परीक्षेचा तपशील :

– परीक्षा : परीक्षेचा कालावधी : संभाव्य कालावधी दिवस :
– लेखी परीक्षा : 29 एप्रिल ते 31 मे 2021 : 33 दिवस
– प्रात्यक्षिक/श्रेणी सुधार /तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा : 28 मे ते 3 जून 2021 : 07 दिवस
– दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयांची परीक्षा : 28 मे ते 9 जून 2021 : 13 दिवस

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहावी-बारावी

संबंधित बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच; प्रत्येक तासाला मिळणार ‘एवढ्या’ मिनिटांचा अधिकचा वेळ

May 25, 2022
मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

मंगळवेढ्यातील 7 विद्यार्थ्यांची एसटी महामंडळ खात्यामध्ये निवड; पार्वती ताड आय.टी.आय कॉलेजचा जिल्ह्यात डंका

May 19, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेत होणार आहे शिक्षक भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड; आताच करा अप्लाय

मोठी संधी! बेरोजगार युवकांसाठी उद्या सोलापुरात प्रशिक्षण शिबिर

May 21, 2022
मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर, MPSC च्या परीक्षाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

MPSC विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ विभागात 3 वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया सुरु होणार

May 13, 2022
मुलांना अभ्यासाची व शाळेची आवड, ओढ कायम राहण्यास सुरुवात होणार; मंगळवेढ्यातील ‘ही’ शाळा बाराही महिने सुसाट धावणार

सोलापूर जिल्ह्यातील ५ संस्थेच्या २० आश्रम शाळेवर प्रशासक; मंगळवेढ्यातील ‘या’ शाळांचा समावेश

May 10, 2022
विद्यार्थ्यांनो! दहावीचा ऑनलाईन निकाल आज, कुठे, कसा पाहाल निकाल; जाणून घ्या

तारखा जाहीर! दहावी आणि बारावीचा निकाल ‘या’ दिवशी लागू शकतो; बोर्डाने केले स्पष्ट

May 10, 2022
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांनो! NEET परीक्षेसाठी अर्जासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

May 7, 2022
मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेत होणार आहे शिक्षक भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड; आताच करा अप्लाय

दिलदार प्राचार्य! मंगळवेढ्यातील ‘या’ शाळेतील शिक्षिका-मदतनीस यांच्या मानधनात ३३.३३ टक्के वाढ

May 6, 2022
भारतातील पहिलीच नोंद! सोलापूर जिल्ह्यात आढळला पांढऱ्या रंगाचा ‘हा’ अतिशय दुर्मीळ प्राणी

भारतातील पहिलीच नोंद! सोलापूर जिल्ह्यात आढळला पांढऱ्या रंगाचा ‘हा’ अतिशय दुर्मीळ प्राणी

May 2, 2022
Next Post
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

महत्त्वाची बातमी! रास्त धान्य दुकानदारांकडून धान्याचे वितरण 1 फेब्रुवारीपासून बंद होणार

ताज्या बातम्या

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील…;संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

May 25, 2022
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

मंगळवेढ्यातील नदी पात्रात महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिविगाळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 25, 2022
उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

उजनी पाणीप्रश्न! म्हणे दत्तात्रय भरणे मामांच्या खाद्यांवर बंदूक; पालकमंत्री बदलून प्रश्न सुटणार का?

May 25, 2022
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

बालविवाह रोखण्यासाठी SP तेजस्वी सातपुतेंचा पुढाकार, प्रत्येक गाव पोलिस अधिकाऱ्यास दिले दत्तक; मंगळवेढ्यातील ‘या’ गावांचा समावेश

May 25, 2022
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

महिना दीड लाख पगार असलेल्या सोलापूरच्या दाम्पत्याचा दीड महिन्यात घटस्फोट; कारण वाचून थक्क व्हाल..

May 25, 2022
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

खळबळजनक! सोलापूर जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर सुतळी बॉम्ब फुटणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या

May 24, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा