mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतात पाणी पोहोचेपर्यंत संघर्ष; चळवळीचा लढा थांबणार नाही; मंगळवेढ्यातील पाणी परिषदेत संघर्ष समितीचे शिवाजीराव काळुंगे यांनी दिला नारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 27, 2026
in मंगळवेढा
पाणी आमच्या हक्काचं! शेतकऱ्यांच्या रानात पाणी पाहिल्याशिवाय ही चळवळ थांबणार नाही; शेटफळे येथे गुरुवारी ३३ वी पाणी संघर्ष परिषद

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्किंग ।

दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक शेतात पाणी पोहोचेपर्यंत पाणी संघर्ष चळवळ थांबणार नाही. ज्या भागांना पाणी मिळाले आहे, त्यांनी वंचित भागांसाठी पुढाकार घ्यावा, अपूर्ण सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी संघर्ष बळकट करावा, असे आवाहन शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटना पाणी संघर्ष समितीचे प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी केले आहे.

मंगळवेढा येथे झालेल्या ३४ व्या पाणी संघर्ष परिषदेत प्रा.शिवाजीराव काळुंगे बोलत होते. या परिषदेत टेंभू उपसा सिंचन योजनेला क्रांतीवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव पारित करण्यात आला. परिषदेच्या अध्यक्षपदी प्रा. शिवाजीराव काळुंगे हे होते.

या परिषदेत अनेक मागण्या आणि जवळपास २० ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यानंतर वैभव नाईकवाडी, आ. समाधान आवताडे, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार विक्रम सावंत, माजी आमदार राजेंद्र देशमुख, गौरव नायकवडी, डॉ. अनिकेत देशमुख,

दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, प्रा. आर. एस. चोपडे, आनंदराव पाटील, प्रा. बाळासाहेब नायकवडी, अॅड. सुभाष पाटील, प्रा. सी. पी. गायकवाड, अॅड. सरफराज बागवान, प्रा. दत्ताजीराव जाधव, विश्वंभर बाबर, अॅड. भारत पवार, व्ही. एन. देशमुख, अॅड. बिरप्पा जाधव, तुकाराम बाबा महाराज उपस्थित होते.

प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, पद्मभूषण क्रांतिवीर स्व. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, स्व. भाई डॉ. गणपतराव देशमुख, स्व. आर. आर. पाटील, स्व. निळू फुले यांच्यासह अनेक नेत्यांनी दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे, म्हणून उभारलेल्या चळवळीमुळे टेंभू, म्हैसाळसह अनेक सिंचन योजना मार्गी लागल्या. भीमा, माण व कोरडा नदीवर बॅरेज उभारावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

आ. समाधान आवताडे, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार विक्रम सावंत, माजी आमदार राजेंद्र देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, गौरव नायकवडी, प्रा. आर. एस. चोपडे, अॅड. सरफराज बागवान, प्रा. दत्ताजीराव जाधव, विश्वंभर बाबर, अॅड. भारत पवार, व्ही. एन. देशमुख, अॅड. बिरप्पा जाधव यांनी मनोगतातून जनतेच्या भावना अधोरेखित केल्या.

राज्यातील अपूर्ण प्रकल्पांना गती द्या

टेंभू, म्हैसाळ, सांगोला शाखा, उरमोडी, धोम, बलकवडी, निरा देवधर, ताकारी, राजेवाडी तलाव इत्यादी जे महाराष्ट्रातील २६ अपूर्ण प्रकल्प कामाला गती देऊन पूर्ण करावेत, टेंभूची सर्व कामे डिसेंबर २०१९ अखेरीस पूर्ण करण्याचे नियोजन होते, अपूर्ण कामे मुदतीत पूर्ण व्हावीत, अशी मागणी परिषदेत झाली.

पाणी परिषदेत वीस ठरावांवर झाली चर्चा

आटपाडी, सांगोला, तासगाव तालुक्यातील पाण्यापासून वंचित गावे व वंचित जमिनीला प्रायोगिक तत्त्वावरती प्रत्येक शेतकऱ्याच्या किमान तीन एकराला पाणी मिळावे, वडापूर बॅरेजचे काम त्वरीत पूर्ण करावे.

मंगळवेढा तालुक्यातील 3 सिद्धापूर, तामदडर्डी व तांडोर या गावांना सिंचनाचा लाभ मिळेल, टेंभूचे पाणी माण नदीत वाडेगावपर्यंत आलेले आहे. ते माण नदीत वाडेगावपासून धर्मगाव बंधाऱ्यापर्यंत सोडण्यात यावे.

माण, भीमा व कोरडा नदीवरील बंधारे नियमितपणे पाण्याने भरून देण्यासाठी या नद्यांना कॅनालचा दर्जा देण्यात यावा. तसेच या तिन्ही नद्यांवर २ टी. एम. सी. पाणीसाठा होणारे बॅरेजेस बांधावे.

उजनीचे पाणी कॅनॉल बेड लेव्हलपर्यंत पाणी सोडावे, बेड लेव्हलपर्यंत धरणातील पाणी शेतीसाठी कॅनॉलमधून सोडण्यात यावे यासह परिषदेत विविध २० ठराव करण्यात आले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 29, 2026
Next Post
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या खोल्या थेट 'सील', मोठ्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मंगळवेढ्यात खळबळ; 'दूध का दूध, पाणी का पाणी' होणार?

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..