mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आषाढी वारी संदर्भात शासन नियमावली जाहीर; जाणून घ्या कशी होणार यंदाची पंढरपूर वारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 16, 2021
in सोलापूर
विठ्ठला! पंढरपुरात राजकीय मेळावे चालतात; मग पायी वारी का नको? शासनाने पुनर्विचार करावा

मंगळवेढा टाईम्स टीम ।

पंढरपूरला होणाऱ्या आषाढी वारी संदर्भात राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सध्या परिस्थिती लक्षात घेऊन आषाढी यात्रा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र शासनाने याबाबत एक नियमावली तयार केली आहे.

मानाच्या १० पालखी सोहळ्यांचा आषाढी वारी प्रस्थान सोहळा : यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. यामुळे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या पालखा व दिंड्यांना प्रतिनिधीक स्वरुपात प्रस्थान सोहळ्याद्वारे आषाढी वारीमध्ये सहभागी होता येईल.

मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी करण्याबाबत प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ कि.मी. अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायीवारी करता येणार आहे.

मानाच्या पालखी सोहळ्यांचा पंढरपूर येथील मुक्काम कालावधी : यावर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पोर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करता येणार आहे.

शासकीय महापुजा, श्री विठ्ठलास संतांच्या भेटी : गतवर्षी प्रमाणे मान्यता देण्यात येत आहे. विठ्ठलाचे २४ तास दर्शनाबाबत : विठ्ठलाचे नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल.

श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी : २+२ असे एकूण ४ व्यक्तिंच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

श्री संत विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक : १ ते १५ साध्या पध्दतीने साजरा करण्यास परवानगी देण्यात येत आहे. ह.भ.प. श्री गुरुदास महाराज देगलूरकर यांचे चक्रीभवन : ह.भ.प. देगलूरकर महाराज व अन्य ४ व्यक्ती असे एकूण ५ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अधीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.

ह.भ.प. श्री अंमळनेरकर महाराज व ह.भ.प. कुकुरमुंडेकर महाराज यांचे दर्शनाबाबत : ह.भ.प. श्री अंमळेनरकर महाराज व ह.भ.प. कुकुरमुंडेकर महाराज यांच्यासोबत प्रत्येकी २ व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.

महाद्वार काला व श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळा : हा उत्सव १ + १० व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरी करण्यास परवानगी देण्यात आली.

एकादशीच्या दिवशीचा रथोत्सव : रथा ऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने १० मानकरी व मंदिर समितीचे ५ कर्मचारी असे १५ वक्तीसह कोरोनाचे नियम पाळून एकादशीच्या दिवशीचा रथोत्सव साजरी करावा.

संताच्या पादुका भेटी : यावर्षी प्रती मानाच्या पालखी ४० वारकऱ्यांना संताच्या पादुका भेटीची परवानगी देण्यात आली आहे. वारकरी संख्या : २ बस व प्रत्येकी बसमध्ये २० प्रमाणे ४० वाकऱ्यांची संख्या निश्चित करण्यास पारवानगी देण्यात आली आहे.

गोपाळकाला : मानाच्या पालखी सोहळ्यांना १ + १० या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन व किर्तन करावे. संताचे नैवेद्य व पादुका : दशमी ते पोर्णिमा असे ६ दिवस २ व्यक्तींना परवानगी देण्यात येत आहे.

संत एकनाथ महाराज काला : संत एकनाथ महाराज यांच्या दिंडीला ज्या प्रमाणात शासनाकडून प्राप्त होईल. तितक्या व्यक्तींच्या उपस्थितीत संत एकनाथ महाराज काला करण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्याबाबत मंदिर समितीमार्फत नियोजन करण्यात येईल.

प्रक्षाळपुजा : श्री विठ्ठलाची प्रक्षाळपुजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक २ + ३ श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा २ + ३, श्री विठ्ठलाकडे ११ ब्रम्हवृंदांकडून विठ्ठलास रुद्राचा अभिषेक व रुक्मिणीमातेस ११ ब्रम्हवृंदास पवनमान अभिषेक करता येणार आहे.

स्थानिक दिंडीकरी व फडकरी महाराज मंडळींना श्रीच्या दर्शनासाठी व्यवस्था : आषाढी एकादशी दिवशी स्थानिक महाराज मंडळींना श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे मुखदर्शन देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आषाढी वारी

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 16, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
Next Post
सकल मराठा समाज पायी दिंडी व आक्रोश मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे : ज्ञानेश्वर कोंडुभैरी

मराठा आरक्षणासाठी माओवाद्यांचं पाठिंब्याचं पत्रं; ठाकरे सरकारसाठी धोक्याची घंटा

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 16, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 16, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा