mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पेट्रोल पंप सुरू करणं आता अधिक सोप झालं, पंप सुरू करण्याबाबतचे अनेक नियम बदलले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 16, 2020
in राष्ट्रीय
पेट्रोल पंप सुरू करणं आता अधिक सोप झालं, पंप सुरू करण्याबाबतचे अनेक नियम बदलले

तुम्हालाही अनेकदा स्वत:चं पेट्रोल पंप असावं असं वाटत असेल. तुम्हीही पेट्रोल पंप सुरू करण्याचा प्लान तयार केला असेल. पण माहितीच्या अभावी तुमचा हा प्लान प्रत्यक्षात उतरला नसेल.

गेल्या वर्षी सरकारनेही पेट्रोल पंप सुरू करण्याबाबतचे अनेक नियम बदलले असून त्यामुळे पेट्रोल पंप सुरू करणं आता अधिक सोप झालं आहे. पेट्रोल पंप सुरू करण्याची ही प्रक्रिया काय आहे? जाणून घेऊया त्याची माहिती.

देशात ‘या’ सात सरकारी कंपन्या

देशात IOC, BPCL, HPCL या सरकारी कंपन्यांसह सात कंपन्या पेट्रोलचं रिटेलिंग करतात. मात्र, टर्न ओव्हरच्या आधारे काही कंपन्या या उद्योगात उतरू शकतात, असं सरकारने मागच्यावेळी स्पष्ट केलं होतं.

त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणत्याही कंपनीचे पेट्रोल पंप सुरू करू शकता. जर तुम्हाला आयओसी या सरकारी कंपनीचे पेट्रोल पंप सुरू करायचे असेल तर त्याबाबतचे नियम जाणून घ्या. त्यामुळे तुम्हाला पेट्रोल पंप सुरू करणं अधिक सोपं जाईल.

पेट्रोल पंप कोणाला सुरू करता येऊ शकते?

भारतात पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर तो देशाचा नागरिक असावा. त्याशिवाय अर्जदार हा इयत्ता 10 वी पास असावा. पूर्वी हीच पात्रता 12 वी पासची होती. पेट्रोल पंपासाठी लागणारा भूखंड तुमचा असेल तर मग काही अडचण नाही.

जर तुम्ही भाड्याने भूखंड घेऊन पेट्रोल पंप सुरू करणार असाल तर तुम्हाला जागेच्या मालकासोबतची कागदपत्रे तयार करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जमीन नसेल तरीही तुम्ही पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकतात. पण अर्जात तसा उल्लेख करणं आवश्यक आहे.

पेट्रोल पंप कसा मिळतो?

अर्जानंतर कंपनी भूखंडाची स्थिती पाहून पेट्रोल पंप देण्याचा निर्णय घेते. पेट्रोल पंपासाठी कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या जाहिरातीत काही नियम आणि अटी शर्ती नमूद केलेल्या असतात. त्यात जमिनीशी संबंधित काही नियमही असतात. अशा वेळी जमीन आणि तुमचा अर्ज पाहून निर्णय घेतला जातो.

शिवाय पेट्रोल पंप देण्यासाठी तुमची मुलाखतही घेतली जाते. तसेच ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार करून फी बाबतचा निर्णय घेतला जातो. तुमच्या पेट्रोल पंपाचं लोकेशन कुठे आहे, त्यावरही शुल्क निर्धारित करण्यात येतं. साधारणपणे सुमारे 20 ते 50 लाखापर्यंतचं शुल्क आकारले जाते.

असा अर्ज करा..

अनेक कंपन्या सातत्याने पेट्रोल पंप सुरू करण्याबाबतच्या जाहिराती देत असतात. या जाहिरातीत अर्ज कसा करायचा याची माहिती दिली जात असते. एवढेच नव्हे तर ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज स्वीकारला जातो. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकता.

किती नफा मिळतो?

ADVERTISEMENT

दिल्लीतील पेट्रोल रेटच्या हिशोबाने अंदाज लावायचा झाला तर 1 डिसेंबर रोजी दिल्लीत पेट्रोलचे भाव 82.34 रुपये प्रतिलिटर एवढे होते. त्यात पेट्रोलची बेस प्राईज 26.34 रुपये आणि फ्रेट 0.37 रुपये म्हणजे एकूण 26.71 रुपये असते.

याचा अर्थ डिलर्सला कोणतीही ड्युटी आणि व्हॅट न लावता पेट्रोल 26.71 रुपयांमध्ये दिले जाते. त्यानंतर 32.98 रुपये एक्साईज ड्युटी, 3.65 रुपये डिलरचं कमिशन आणि 19 रुपये व्हॅटचा समावेश असतो. त्यानंतर पेट्रोलचा भाव 82.34 रुपये होतो. म्हणजे डिलरला 3.65 रुपये प्रति लिटर मागे कमिशन मिळते. या शिवाय त्यांना अनेक फायदेही मिळतात.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पेट्रोल पंप
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हीराबेन यांचं निधन; शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम. आई गेल्यानंतर मोदी यांचं भावूक ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक, हीराबेन यांचं निधन; शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम. आई गेल्यानंतर मोदी यांचं भावूक ट्विट

December 30, 2022
नवरा पावशेर! जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या वराबाबत धक्‍कादायक माहिती उजेडात

सोलापूर विवाहाची दिल्लीतही चर्चा; खासदाराने थेट संसदेत केली ‘ही’ मागणी

December 17, 2022
सावधान! सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताय; तुमची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग सज्ज

ऑनलाईन खरेदी करताय, सावधान; 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना

December 12, 2022
ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

ऐतिहासिक निर्णय! आर्थिक दुर्बलांच्या १० टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टानं १०३ वी घटनादुरुस्ती ठरवली वैध

November 7, 2022
IND vs BAN T20 WC: थरारक सामन्यात भारताचा विजय; सेमीफायनलचा मार्ग सुकर

ICC T20 World Cup : भारताचा झिम्बाब्वेवर मोठा विजय; उपांत्य फेरीत असेल ‘यांच्याशी’ मुकाबला

November 6, 2022
IND vs BAN T20 WC: थरारक सामन्यात भारताचा विजय; सेमीफायनलचा मार्ग सुकर

IND vs BAN T20 WC: थरारक सामन्यात भारताचा विजय; सेमीफायनलचा मार्ग सुकर

November 2, 2022
पाकिस्तानचं आव्हान जवळपास संपुष्टात; पर्थमध्ये ‘या’ टीमनं केला पाकिस्तानचा केला चुराडा

पाकिस्तानचं आव्हान जवळपास संपुष्टात; पर्थमध्ये ‘या’ टीमनं केला पाकिस्तानचा केला चुराडा

October 27, 2022
नको त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपमुळे हैराण झालात? सेटिंगमध्ये करा फक्त हे बदल!

WhatsApp युजर्स ‘मेटा’कुटीला; कंपनीने दिलं स्पष्टीकरण; सांगितलं कधी सुरू होणार…

October 26, 2022
ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज सर्वोच्च न्यायलायने फेटाळला; सेनेची लढाई आता…

ठाकरेंना मोठा धक्का! शिवसेनेने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज सर्वोच्च न्यायलायने फेटाळला; सेनेची लढाई आता…

September 27, 2022
Next Post
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सोलापूर ब्रेकिंग! 'हे' ऍप डाउनलोड करायला सांगून केली फसवणूक, महिलेच्या खात्यातून दीड लाख ट्रान्स्फर केले

ताज्या बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा