mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यात 24 शिक्षक निघाले कोरोना पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 23, 2020
in सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्‍यातील 24 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांनी दिली.

दरम्यान, तालुक्‍यातील नववी ते बारावीतील 17 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांनी शनिवारअखेर संमतीपत्र दिले असल्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी सांगितले.

तालुक्‍यातील नववी ते बारावीच्या शाळांची संख्या 79 आहे. त्यामध्ये 22 हजार 867 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी तीन हजार 930 विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळांकडे संमतीपत्र भरून दिले आहे.

नववी ते बारावीपर्यंतच्या तालुक्‍यातील शिक्षकांची संख्या 954 असून त्यापैकी गणित, इंग्रजी व विज्ञान विषय शिकविणारे 577 शिक्षक आहेत.

शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार म्हणून तालुक्‍यातील एक हजार 449 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 279 शिक्षकांच्या आरटी-पीसीआर तर उर्वरित शिक्षकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये 24 शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्‍यातील अनेक शाळांनी आजपासून शाळा सुरू करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. शालेय परिसर स्वच्छता करण्याबरोबरच वर्गखोल्यांची साफसफाई करून सॅनिटायझेशन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे तापमान व ऑक्‍सिजन लेव्हल तपासण्यासाठी थर्मल गन व ऑक्‍सिमीटर खरेदी केले आहेत.

मात्र, काही संस्थांनी शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. काही संस्थांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. संमतीपत्र देणाऱ्या पालकांची अल्पसंख्या पाहता शाळांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत साशंकता आहे.

शिक्षणसंस्था, शाळा, पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी त्याबाबतचे अधिकार जिल्हा व महापालिका प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक येथील प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था, शाळा, पालक व विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.

शासनाने शाळा सुरू करण्याची जबाबदारी जिल्हा व महापालिका प्रशासनावर सोपविली आहे. जिल्हा व महापालिका प्रशासनाने ती जबाबदारी शिक्षणाधिकारी व महापालिका प्रशासनाधिकाऱ्यांकडे दिली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी तीच री ओढत शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितींवर सोपविला आहे.

राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, शिक्षणाधिकारी शाळा सुरू करण्याबाबत ठोस भूमिका घेत नसतील तर शाळा व्यवस्थापनाने ती जबाबदारी का घ्यावी, असा प्रश्न काही स्थानिक शाळा व्यवस्थापनाकडून उपस्थित केला जात आहे. शिवाय सॅनिटायझेशन, थर्मलगन, ऑक्‍सिमीटर याचा खर्च कोणी करायचा, हा प्रश्न भेडसावत आहे.(सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर कोरोना

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
Next Post

हे बेईमानीने आलेले सरकार आहे; आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : फडणवीसांचे सूचक विधान

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा