टीम मंगळवेढा टाईम्स । धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यभर ‘ढोल बजाओ, सरकार जगाओ’ आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, सोलापुरात याच आंदोलनाच्या संयोजकावर खूनी हल्ला झाला आहे. हा हल्ला धनगर समाजाच्या नेत्यानेच केला आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर रोडवर घडली आहे. गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि सोलापुरातील आंदोलनाचे संयोजन शरणू हांडे यांनी केले होते. त्या मोर्चात धनगर नेते अर्जुन सलगर यांनी गोपीचंद पडळकरांवर टीका केली होती. त्यातूनच सोशल मीडियावर टीका टिप्पणी सुरू झाली.
सोशल मीडियावरच दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटला होता.या वादातूनच सलगर आणि हांडे यांच्यात वाकयुद्ध सुरू झाले आणि त्यातूनच हांडे यांच्यावर रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पाच ते सहा तरूणांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात हांडे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी धनगर समाजाचे नेते अर्जुन सलगर, सुजित कोपरे, अनिकेत तुळ, लखन गावडे आणि इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
25 सप्टेंबर रोजी एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी धनगर समाजानं शुक्रवारी ढोल बजाव आंदोलन पुकारले होते. सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर हा प्रकार घडला.
After the agitation called by Gopichand Padalkar in Solapur, the leaders of ‘Dhangar’ community carried out a murderous attack on the organizer.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज