मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. ते सध्या पुण्यात असून त्यांचे अनेक जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी पुढील चार दिवसांचे दौरे रद्द केले आहेत.
आता शरद पवारांना नेमका कसला त्रास होतोय, डॉक्टरांची अपडेट काय, याबद्दलची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना खोकला आणि कफचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांचे सर्व जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
शरद पवारांची प्रकृती ठीक होईपर्यंत ते मोदी बागेतील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत, असे सांगितले जात आहे. तसेच शरद पवार यांना थकवा जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
अचानक शरद पवारांची प्रकृती बिघडली
गेले वर्षभर महाराष्ट्रात निवडणुकांची धामधूम पाहायला मिळाली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका मे महिन्यात पार पडल्या. यानंतर विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात पार पडल्या. या निवडणुकानंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष हे तयारी करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडूनही आगामी निवडणुकांची तयारी केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पक्ष बांधण्यासाठी शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मात्र काल अचानक शरद पवारांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली.
शरद पवारांचा विदर्भ दौरा रद्द
शरद पवारांना गेल्या 8 ते 10 दिवसांपासून खोकल्याचा त्रास सुरु होता. तसेच गेले काही दिवस भाषण करतानाही त्यांना दम लागत होता. यानंतर काल शरद पवार यांची तब्येत बिघडली.
यानंतर डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्ला आहे. सोमवार, मंगळवार दोन दिवस शरद पवार विदर्भ दौऱ्यावर होते. मात्र तब्येत बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांनी काळजी करु नये
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. परंतु कार्यकर्त्यांनी काळजी करु नये, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज