mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो! पहिल्या लग्नाचा खर्च सरकारचा, अनेकांना ही योजना माहीतच नाही; कसा करायचा अर्ज?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 9, 2026
in मनोरंजन, राज्य
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मंगळवेढा टाईम्स न्युज ।

आपलं लग्न धडक्यात करावं, अशी अनेकांची इच्छा असते. पण गरीबी किंवा आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना हे शक्य होत नाही. अनेकजण आपली हौस पूर्ण करण्यासाठी खासगी सावकार किंवा सरकारी बँकांमधून कर्ज काढून लग्न करतात.

पण लग्न झाल्यानंतर हे कर्ज फेडण्यासाठी पुढची काही वर्षे कष्ट करावं लागतं. निम्मे पैसे तर व्याजासाठीच मोजावे लागतात. पण तुम्हाला सरकारच्या काही योजना माहीत असतील तर लग्नाळू पोरांच्या डोक्यावरचा आर्थिक भार काहीसा कमी होतो.

खरं तर, महाराष्ट्र सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. पण यातील बऱ्याच योजनांची लोकांना माहिती नसते. अशीच एक योजना म्हणजे ‘प्रथम विवाह खर्च’ योजना. ही योजना अनेकांना माहीत नाही.

मात्र महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभाग आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून ही योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या लग्नासाठी ३० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सध्याच्या घडला एवढ्या एवढ्या पैशात लग्न होणं कठीण आहे. मात्र या पैशामुळे विवाह असलेल्या कुटुंबावरचा काहीसा ताण नक्कीच कमी होऊ शकतो.

‘प्रथम विवाह खर्च’ योजना नेमकी काय आहे?

महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागांतर्गत असलेल्या ‘महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळा’कडून ही योजना चालवली जाते. या योजनेचं नाव ‘प्रथम विवाह खर्च’ योजना असून नोंदणीकृत कामगारांसाठी एक अत्यंत फायदेशीर योजना आहे.

या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगाराला स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी सरकारकडून ३०,००० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट कामगाराच्या बँक खात्यात जमा केली जाते.

कोण करू शकतं अर्ज?

– अर्जदार हा बांधकाम क्षेत्रात किंवा बांधकाम संबंधित कामात गुंतलेला मजूर/कामगार असावा.
– तो कामगार ‘महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळा’कडे (MBOCWWB) अधिकृतपणे नोंदणीकृत असावा.

अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. यासाठी सर्वात आधी तुम्हाला मंडळाच्या (MBOCWWB) अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या योजनेचा ‘अर्ज फॉर्म’ डाऊनलोड करावा लागेल. या अर्जात विचारलेली सर्व माहिती आणि त्यासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडावेत.

यानंतर हा अर्ज तुमच्या भागातील कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकाऱ्याकडे नेऊन जमा करावा. अर्ज जमा केल्यावर तिथल्या अधिकाऱ्याकडून पोहोच पावती नक्की घ्या. या पावतीवर अर्ज जमा केल्याची तारीख, वेळ आणि आयडी नंबर असल्याची खात्री करा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला अर्जाची स्थिती तपासता येईल.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

– पासपोर्ट आकाराचा फोटो.
– आधार कार्ड.
– महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे ओळखपत्र (स्मार्ट कार्ड).
– बँकेचे पासबूक प्रत
– रहिवासी पुरावा (यापैकी कोणतेही एक: आधार कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स / रेशन कार्ड / वीज बिल / ग्रामपंचायत प्रमाणपत्र).
– विवाह प्रमाणपत्र (लग्नाचा दाखला).
– हे तुमचं पहिलंच लग्न असल्याचं सांगणारं प्रतिज्ञापत्र (Affidavit).

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: प्रथम लग्न योजना

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
Next Post
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

विद्यार्थ्यांनो..! १० वी, १२ वी नंतर पुढे काय? आमदार समाधान आवताडेंच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्यात रंगणार 'गुणगौरव व करिअर मंत्र सोहळा

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 13, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा