मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पंचांगानुसार, आज 27 जानेवारी 2025, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल.
तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष
आज कोणत्याही बाबतीत कमीपणा घ्यावा लागल्यामुळे थोडा त्रास होईल.
वृषभ
वाद्याची साथ लाभल्यामुळे तुमचा जीवनासंबंधीचा एकंदर दृष्टिकोनच बदलेल.
मिथुन
काही कारणामुळे भावनावश होऊ शकता. तुमच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींना आनंदी आणि उत्साही कराल.
कर्क
घरामध्ये तुमचा चोखंदरपणा जाणवेल. कलाकारांच्या कला बहरतील.
सिंह
कामामध्ये प्राविण्य आणि नावलौकिक लाभेल. घरामध्ये तुमची सौंदर्याभिरूची दाखवून द्याल.
कन्या
डोळ्याच्या विकारासाठी योग्य वेळी औषधोपचार करावे लागतील.
तूळ
कापड धंदा, वाद्य वादन, टेलरिंग. कलेशी निगडित व्यवसाय उत्तम चालतील.
वृश्चिक
महिला बौद्धिक क्षेत्रात चमकतील. दुसऱ्यांना उत्तम सहकार्य कराल.
धनु
स्वतःची कामे सोडून लष्कराच्या भाकरी भाजायचा मोह होईल.
मकर
तुमच्या कामाची योग्य दखल न घेतल्यामुळे नाराजी पदरात पडेल.
कुंभ
व्यवहारात हजरजबाबीपणा दाखवाल, परंतु त्याला स्पष्टवक्तेपणाची झालर असेल.
मीन
नोकरी, व्यवसायात काही लोक दुखावले जाण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज