मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
वेळेचं मानक निश्चित करण्यासाठी सरकारने सर्व अधिकृत आणि व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रमाणवेळेचा वापर बंधनकारक करणाऱ्या नियमांचा मसुदा तयार केला आहे.
ग्राहक मंत्रायलाकडून १४ फेब्रुवारीपर्यंत यावर प्रतिक्रिया मागितल्या आहेत. देशात सगळीकडे एकच वेळ असावी यासाठी हालचाली केल्या जात आहेत.
भारतीय प्रमाण वेळ नियम २०२४ चा उद्देश वेळचे मानक निश्चित करण्यासाठी एक कायदा तयार करणं हा आहे. यात कायदेशीर, प्रशासकीय, व्यावसायिक आणि अधिकृत कागदपत्रांवर एकमेव वेळेचा संदर्भ म्हणून IST बंधनकारक केले आहे.
वेळेबाबत तयार करण्यात आलेल्या मसुद्यानुसार, व्यावसायिक, परिवहन, सार्वजनिक प्रशासन, कायदेशीर करार, आर्थिक व्यवहारांसह सर्व क्षेत्रात आयएसटी हे प्रमाण वेळेचा संदर्भ म्हणून बंधनकारक असेल.
अधिकृत आणि व्यावसायिक उद्देशांमध्ये आयएसटीशिवाय वेळेच्या इतर संदर्भांच्या वापराला बंदी, सरकारी कार्यालय, सार्वजनिक संस्थांमध्ये आयएसटीचा वापर बंधनकारक करणं यांचा समावेश आहे.
ग्राहक मंत्रालयाने टेलिकम्युनिकेशन, बँकिंग, संरक्षण, ५जी, एआय यांसारख्या उदयाला येणाऱ्या नव्या टेक्नॉलॉजीसह महत्त्वाच्या राष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेळेचं पालन निश्चित करण्याचा एक प्रयत्न म्हणून हा प्रस्ताव मांडला आहे.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, स्ट्रॅटेजिक आणि बिगर स्ट्रॅटेजिक क्षेत्रांसाठी नॅनोसेकंदासह अचूक वेळेची आवश्यकता आहे. खगोलशास्त्र, नेविगेशन, वैज्ञानिक संशोधन यांसारख्या विशेष क्षेत्रांसाठी अपवादात्मक स्थितीत परवानगी दिली जाईल. त्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज असेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज